Shivaji Maharaj statue : मालवण राजकोट किल्ल्यावर कट्टर विरोधक विजय वडेट्टीवार आणि खासदार नारायण राणे आमने सामने
Shivaji Maharaj statue : कधीकाळी सहकारी आणि आता कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार यांनी आमने-सामने आल्यानंतर हस्तांदोलन केले.
![Shivaji Maharaj statue : मालवण राजकोट किल्ल्यावर कट्टर विरोधक विजय वडेट्टीवार आणि खासदार नारायण राणे आमने सामने Shivaji Maharaj statue Staunch opponent Vijay Wadettiwar and MP Narayan Rane face off at Malvan Rajkot Fort Shivaji Maharaj statue : मालवण राजकोट किल्ल्यावर कट्टर विरोधक विजय वडेट्टीवार आणि खासदार नारायण राणे आमने सामने](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/28/8a0db2c9ace204b3d508efd0168ceccf1724828626047736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Shivaji Maharaj statue : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघा आठ महिन्यात कोसळल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रामध्ये संतप्त भावना पसरल्या आहेत. अवघ्या राज्यभर संतापाची लाट पसरली असल्याने आज (28 ऑगस्ट) महाविकास आघाडीकडून राजकोटमध्ये निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.
कट्टर विरोधक विजय वडेट्टीवार आणि खासदार नारायण राणे आमने सामने
महाविकास आघाडीमधील नेत्यांसह सत्ताधारी महायुतीमधील नेते सुद्धा पोहोचले आहेत. खासदार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी राजकोटवर पोहोचले. या दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार सुद्धा पोहोचले. त्यामुळे कधीकाळी सहकारी आणि आता कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे आणि विजय वडेट्टीवार यांनी आमने-सामने आल्यानंतर हस्तांदोलन केले. दरम्यान, महाविकास आघाडीकडून मोर्चा आयोजित करण्यात आल्याने माजी खासदार विनायक राऊत यांचे समर्थक सुद्धा राजकोट किल्ल्यावर पोहोचले आहेत.
त्यामुळे नारायण राणे समर्थक आणि विनायक राऊत समर्थक आमने सामने आल्याने राजकोट किल्ल्यासमोर घोषणाबाजी देत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रसंग सुद्धा घडला. महाविकास आघाडीकडून भरड नाका ते तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. हा राडा एका बाजूने सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे सुद्धा पोहोचले. यावेळी पेंग्विन, पेंग्विन अशा घोषणा देण्याचा प्रयत्न केला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)