आनंदराव अडसूळ यांचं मानसिक संतुलन बिघडलंय त्यांनी चांगले उपचार करावे, खर्च मी करतो; रवी राणांची बोचरी टीका
Ravi Rana on Anandrao Adsul :माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचं मानसिक संतुलन सध्या बिघडलेलं आहे. त्यांनी चांगले उपचार घ्यावे, त्यासाठी लागणारा सर्व खर्च मी करतो. अशी टीका आमदार रवी राणांनी केलीय.

Ravi Rana on Anandrao Adsul अमरावती : राज्यपाल पदाच्या नियुक्तीवरुन महायुतीत चांगलीच खडाजंगी रंगली असताना आज पुन्हा शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. अशातच त्यांनी अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांच्यावर निशाणा साधत नवनीत राणांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत पुन्हा न्यायालयात आव्हान देण्याचा निर्धार केला आहे. या विषयी आता आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी पलटवार करत आनंदराव अडसूळ यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
वयाप्रमाणे आता त्यांना आराम करण्याची गरज- आमदार रवी राणा
माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांचं मानसिक संतुलन सध्या बिघडलेलं आहे. वयाप्रमाणे आता त्यांना आराम करण्याची गरज आहे. ज्या प्रमाणे आज ते आम्हाला ब्लॅकमेल करत आहे, तसेच ते देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचं नाव घेऊन ते ब्लॅकमेल करत आहेत. आज नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत विरोधात काम केलं अमरावती मध्ये येऊन त्यांनी महायुती विरोधात प्रचार केला. नवनीत राणा यांना पाडण्यासाठी त्यांनी पूर्ण यंत्रणा कामाला लावली. किंबहुना त्यांनी अमित शहा यांना शब्द दिला होता की, आम्ही नवनीत राणांना विजयी करण्यासाठी काम करू. मात्र त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही आणि ते खोट बोलले. आज त्यांचे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलं असल्याची बोचरी टीका आमदार रवी राणा यांनी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचावर केलीय.
उपचाराचा सर्व खर्च मी करतो - आमदार रवी राणा
राज्यपाल पद आणि इतर मागण्या करून त्यांनी स्वत: च मानसिक संतुलन बिघडलंय हे त्यांनी खऱ्याअर्थाने सिद्ध केलंय. त्यामुळे त्यांना आरामची गरज आहेच शिवाय चांगल्या डॉक्टर आणि चंगल्या उपचाराचीही गरज आहे. त्यांनी ते उपचार घ्यावे, त्यासाठी लागणारा सर्व खर्च मी करतो. आनंदराव अडसूळ यांनी काळजी स्वत:ची घ्यावी, असेही आमदार रवी राणा म्हणाले.
काय म्हणाले होते आनंदराव अडसूळ?
सर्वोच्च न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्राबाबत नवनीत राणांच्या (Navneet Rana) बाजूने दिलेला निकाल समाजासाठी घातक आहे. या विरोधात येत्या काही दिवसात आपण पुन्हा न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिलीय. या सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आम्ही अमरावती जिल्ह्यातील तिवसा, दर्यापूर, बडनेरा या तीन विधानसभेच्या जागा मागणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
