एक्स्प्लोर

ठाकरे-शिंदे एकत्र येण्यावर संजय राऊतांचंही मोठं वक्तव्य, थेटच म्हणाले...

Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. यावर आता खुद्द खासदार संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

Maharashtra Political Crisis :  राज्याच्या राजकारणात मागील काही दिवसात एकापेक्षा एक मोठे भूकंप होत आहेत. शिवसेनेतून बंड करत 50 आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करत मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. खासकरुन शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्या ट्वीटनंतर ही चर्चा जास्तच जोरात होऊ लागली आहे. यावर आता खुद्द खासदार संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं आहे की, दिपाली सय्यद अभिनेत्री आहेत. पक्षाचे काम करतात. त्यांना हे अधिकार कोणी दिले याची मला माहिती नाही.  अशा प्रकारची वक्तव्यं खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. हे एकत्र होईल का हे येणारा काळ ठरवेल. ते आमचेच सहकारी, आमचेच मित्र आहेत. इतकी वर्ष आम्ही काम केलेलं आहे. तर एकत्र यावं असं का वाटणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे. 

मंत्रिमंडळावरुन बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत म्हणाले की, आमचे मंत्री सात होते, दोघे नव्हते.  इथे गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट दोघांमध्ये होत आहे.  भाजपमध्ये घटना तज्ञ, कायदे तज्ञ यांची फार मोठी फौज आहे. त्याची पीसं काढतील. पण यात नैतिकता कुठे आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

संजय राऊत म्हणाले की, तुमच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे शपथविधी करू शकला नाही. यांना मंत्रिपदाची शपथ घेण्याचा अधिकार राहिलेला नाही. घटना तुडवायची ठरवलं असेल तर मग तुमची मर्जी असंही राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, जे 40 लोक सोबत नेले त्यांच्यावर भरपूर काही आरोप भाजपनेच केले आहेत. अशा लोकांसोबत मांडीला मांडी लावून कसं बसायचं याबद्दल आता भाजपला चिंता आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबला आहे, असंही ते म्हणाले. 

त्यांनी म्हटलं की, हे सगळे मंत्री पदासाठी गेलेले लोक आहेत. अनेक लोक मुंबईत येऊन शक्ती प्रदर्शन करत आहेत मंत्री करा असे प्रकार शिवसेनेत कधी झालेले नाहीत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj jarange Health : अशक्तपणा, पोटदूखी, पाच दिवसाच्या उपोषणानंतर जरांगे रुग्णालयात दाखलPlane book for Yatra Kolhapur : भादवणकरांचा नाद खुळा, गावच्या यात्रेला थेट विमान बूक, मुंबईतून रवानाPune Police on Sam David | सॅमचा बॉलिवूड ते आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा प्रवास, पोलिसांकडून पर्दाफाशManoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
सुरेश धसांनी ज्यूस पाजला, मनोज जरांगेंचं अंतरावालीतील उपोषण स्थगित; आता मोर्चा मुंबईकडे
Arvind Kejriwal : यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
यमुनेत विष असल्याचा पुरावा द्या, नोटीसवर नोटीस सुरुच; केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयुक्त राजकारण करत आहेत, दिल्लीतून निवडणूक का लढवत नाही?
Embed widget