Security: मविआ नेत्यांच्या सुरक्षेत कपात, तर शिंदे गटाच्या नेत्यांच्या सुरक्षेत वाढ; शिंदे गटाच्या 10 खासदार, 41 आमदारांना वाय प्लस सुरक्षा
राज्यांतील परिस्थिती पाहता शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरवणे गरजेचं आहे हे लक्षात आल्यानंतरच या आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

मुंबई : राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांत शहकटशहाचं राजकारण सुरु असताना शिंदे सरकारनं दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षेत कपात (Security) केली तर काहींची सुरक्षा काढून घेतली. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच सरकारने शिंदे गटाला सुरक्षाकवच दिलंय. शिंदे गटाचे (knath Shinde) दहा खासदार आणि 41 आमदारांना राज्य सरकारनं वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे त्यामुळे आता यावरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हं आहेत.
एबीपी माझाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार राज्यांत सत्ता बदल झाल्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांवर आणि त्यांच्या शाखा आणि घरावर हल्ला झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर सर्व आमदारांना सीआरपी जवानांची सुरक्षा पुरवण्यात आली होती. आता माञ ही सुरक्षा कमी करण्यात आल्यामुळे या आमदारांना ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे. याबाबत गृह खात्याची रिव्ह्यू मीटिंग पार पडली त्यामध्ये या आमदारांच्या सुरक्षेबाबत चर्चा झाली. अजूनही राज्यांतील परिस्थिती पाहता या आमदारांना सुरक्षा पुरवणे गरजेचं आहे हे लक्षात आल्यानंतरच या आमदारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
सुरक्षा रद्द करण्यात आलेले प्रमुख नेते
- सतेज पाटील (Satej Patil)
- बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)
- नाना पटोले (Nana Patole)
- छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)
- जयंत पाटील (Jayant Patil)
- धनंजय मुंडे (Dhananjay Munde)
- विजय वडे्टीवार (Vijay Wadettiwar)
- भास्कर जाधव (Bhaskar Jadhav)
- अनिल परब (Anil Parab)
- नरहरी झिरवळ (Narhari Zirwal)
सुरक्षा कायम असलेले नेते
- मिलिंद नार्वेकर
- अशोक चव्हाण
- जितेंद्र आव्हाड
- अमित देशमुख
- विश्वजीत कदम
- वर्षा गायकवाड
- यशोमती ठाकूर
- के सी पाडवी
महाविकास आघाडीतल्या अनेक नेत्यांची आणि मंत्र्यांची सुरक्षा काल अचानक नव्या सरकारने रद्द केली आणि त्यानंतर विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड उठवण्यात आलीय. धक्कादायक बाब म्हणजे नव्या सरकारने नार्वेकर, आव्हाड आणि अशोक चव्हाण यांना अभय दिला आहे. त्यात ही मिलींद नार्वेकर यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
Milind Narvekar : विलासराव देशमुख ते एकनाथ शिंदे 'हे' सात मुख्यमंत्री मिलिंद नार्वेंकरांसाठी 'लकी'
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
