(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Hanuman Chalisa Loudspeaker Row LIVE : भोंग्यांवरुन सुरु असलेला गोंधळ सुरुच; प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर...
Case Registered Against Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भोंग्यावरुन सुरु असलेला गोंधळ राज्यभरात सुरुच आहे. प्रत्येक अपडेट्स पाहा...
LIVE
Background
Loudspeaker Controversy : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू (Hanuman Chalisa Loudspeaker Row LIVE) करण्यात आलं आहे. पहाटेच्या अजानवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं आहे. मुंबईतील अनेक भागांत मनसैनिकांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं. राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे.
ठाण्यातील मनसैनिकांनी आज पहाटे झालेल्या अजानचा विरोध करत लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावली. पहाटे 5.14 मिनटांनी ठाणे इंदिरा नगरमधील एका मशिदीवर अजान झाली. त्याचा विरोध म्हणून मनसे कार्यकर्ते पप्पू कदम यांनी या मशिदीच्या जवळच असलेल्या इंदिरा डोंगरावरच्या महालक्ष्मी मंदिरात भोंगा लावून हनुमान चालिसा पठण सुरू केलं. तर कल्याण डोंबिवलीमध्ये 50 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेकडून नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. काल रात्रीच्या सुमारास मनसेच्या 20 ते 25 कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. काल रात्रीपासूनच मशिद-मंदिर परिसरात पोलिसांची गस्त सुरू आहे. कल्याण परिसरातील मशिदींमध्ये पहाटेच्या सुमारास अजान भोंग्याविना झाली. अजानसाठी लाऊडस्पीकर लावण्यात आले नव्हते. तसेच, नवी मुंबई- ऐरोलीजवळच्या जामा मशिदीसमोर हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करण्यात आला होता. हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
औरंगाबादमध्येही कडेकोट बंदोबस्त
औरंगाबादमध्ये 48 मशिदींबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. संवेदनशिल ठिकाणी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये 1 मे रोजी झालेल्या सभेतच मशिदीवरील भोंग्यांबाबत इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी शहरात संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्तही वाढवला आहे.
मुंबई पोलीस अलर्ट मोडवर
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात भूमिका कायम ठेवलीय. राज्यात ठिकठिकाणी मनसेकडून हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रात्रीपासून पोलीस अलर्ट मोडवर आहेत. मुंबईतील रस्त्यावर ठिकठिकाणी नाकाबंदी करुन प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येतेय.
मनसे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांनी दोन दिवसापूर्वी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad) जाहीर सभा घेतली होती. या सभेला अटी शर्तींसह परवानगी दिली होती. मात्र या सभेदरम्यान नियम अटी न पाळल्याने औरंगाबादेतील सिटी चौक पोलीस ठाण्यात राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला. औरंगाबादच्या सभेत त्यांनी मशिदींसमोरील भोंगा हटवला नाही तर दुप्पट आवाजानं हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. त्यासाठी 4 मे रोजीचा अल्टिमेटम दिला होता. आता याप्रकरणी पोलीस पुढे काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा पार पडली. मनसेच्या या जाहीर सभेसाठी पोलिसांकडून अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली होती. परंतु, राज ठाकरेंनी सभेत अनेक अटींचं उल्लंघन आल्याचं समोर आलं होतं. सभेनंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी विविध स्तरांतून होत होती. अशातच औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकून राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा घेतला. त्यानंतरच औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसेच्या नेत्यांना पोलिसांकडून नोटीस
राज ठाकरे यांच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेनंतर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या जात आहेत. राज ठाकरे यांच्या सभेनंतर दोन समाजात तेढ निर्माण होण्याची पोलिसांनी शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे आपण तेढ निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करु नये म्हणून पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहेत. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांनाही पोलिसांना नोटीस पाठवल्या आहेत.
Sangli : मंदिर आणि मशिदीवर लाऊडस्पीकर लावण्याच्या मागणीसाठी 50 अर्ज
सांगली जिल्ह्यात पाच वाजेपर्यंत मशिद आणि मंदिरावर लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी मागणारे एकूण 50 अर्ज आलेत.
मुंबईतील अनेक मशिदींनी सकाळची अजान बंद केली, भोंगेही काढले, अनेत ठिकाणी भोंग्याशिवाय अजान, या बदलाचं स्वागत केलं पाहिजे : हुसेन दलवाई
Mumbai News : आम्ही वांद्रे परिसरात निर्णय घेतला होता की प्रत्येक मशिदींमध्ये डेसिबल मीटर लावून सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार अजानचा आवाज ठेवला जाईल. त्याचबरोबर भोंग्यांच तोंड हिंदू वस्तीच्या दिशेला नसून मुस्लीम वस्तीच्या दिशेला असावं. या निर्णयमुळे आमच्या परिसरामध्ये आवाज एकदम कमी झाला आणि कोणाला त्रास नाही, कोणाची तक्रारही नाही. अशाप्रकारे संपूर्ण मुंबईमध्ये जर नियमांच पालन केलं तर कोणताही प्रश्न राहणार नाही, असं वक्तव्य काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केलं. तसंच मुंबईत अनेक मशिदींनी सकाळची अजान बंद केली आहे. तर अनेकांनी भोंगेही काढले आहेत. अनेक ठिकाणी भोंग्याशिवाय अजान दिली जात आहे. या बदलाचं स्वागत केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
राष्ट्रवादी महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची नियुक्ती, राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांची घोषणा
राष्ट्रवादी महिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची नियुक्ती, राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांची घोषणा
मुंबईतल्या 1140 पैकी 930 मशिदींकडे तर 2400 पैकी 24 मंदिरांकडे भोंग्यांसाठी परवानगी, सर्वधर्मियांच्या बैठकीत पोलीस आयुक्तांची माहिती
Mumbai News : मुंबईतल्या 1140 पैकी 930 मशिदींकडे भोंग्यांसाठी परवानगी असून तर 2400 पैकी 24 मंदिरांकडे भोंग्यांसाठी परवानगी असल्याची माहिती पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिली. भोग्यांबाबत मार्गदर्शक सूचनांसाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सर्वधर्मियांच्या प्रतिनिधींसोबत बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी ही माहिती दिली.