(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकतात, आमदार संजय शिरसाटांचा मोठा दावा
राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटी वारंवार होत आहेत. त्यामुळे हे दोन नेते एकत्र येऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. शिरसाट यांनीही आज त्याला दुजोरा दिला.
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज ठाकरे (Raj Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एकत्र येऊ शकतात असा मोठा दावा शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी केलाय. फेब्रुवारीत हे दोन नेते एकत्र येऊ शकतात असा दावा शिरसाट यांनी एबीपी माझाशी बोलताना केला. काल राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची पुन्हा भेट झाली. शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटी वारंवार होत आहेत. त्यामुळे हे दोन नेते एकत्र येऊ शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र शिरसाट यांनीही आज त्याला दुजोरा दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, राज ठाकरे आणि राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय भेट ही जाहीरपणे घेतली जात नाही. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यास हा राजकरणातील मोठा बॉम्बस्फोट असेल. सध्याच्या घडीला ते एकत्र येण्याची कोणतीची चिन्ह नाही. राज ठाकरे सोबत आले तर काही गैर नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जानेवारीच्या शेवटच्या आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काही बैठका झाल्या तर त्यामध्ये काही निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या काही चर्चा नाही. निवडणुकीत प्रत्येकाची आवश्यकता प्रत्येकला भासते. त्यामुळे राज ठाकरे सोबत आले तर आनंद आहे.
एकनाथ शिंदेची ही जाहीर सभा नाही तर कार्यकर्ता मेळावा
एकनाथ शिंदेंचा दौरा सहा जानेवारीपासून सुरू होणार आहे. 11 जानेवारीला छत्रपती संभाजीनगरला सभा येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हा कार्यकर्ता मेळावा असून जाहीर सभा नाही. आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येण्यात येणार. या मेळाव्याला जाहीर सभेचे स्वरुप देण्यात येणार नाही, असेही शिरसाट म्हणाले.
आमदार अपात्रता निकाल आमच्या बाजूने लागणार : शिरसाट
शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी बोलताना शिरसाट म्हणाले, 10 जानेवारीच्या निकालची आम्हाला चिंता नाही. आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. या प्रकरणाचा निकाल आमच्या बाजूने लागणार याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
आगामी काळातील युतीची नांदी अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगू लागलीये. कारण जनतेच्या विषयावर झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड देखील चर्चा झाली. बंद दाराआड झालेल्या या चर्चेमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.
हे ही वाचा :