(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wine : डाळींबापासून वाईन बनवण्यास परवानगी मिळावी; शेतकऱ्यांची मागणी
Wine : आरोग्यासाठी हितवर्धक असलेल्या डाळींबापासून वाईनचे उत्पादन करण्याची मागणी नाशिकच्या कसमा पट्ट्यातील डाळींब उत्पादक शेतकरी करु लागले आहेत.
Wine : राजभरातील सुपरमार्केटमधून वाईनची विक्री करता येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. सरकारच्या या निर्णयाला विविध क्षेत्रातून विरोध होऊ लागला आहे. परंतु, आरोग्यासाठी हितवर्धक असलेल्या डाळींबापासून वाईनचे उत्पादन करण्याची मागणी नाशिकच्या कसमा पट्ट्यातील डाळींब उत्पादक शेतकरी करु लागले आहेत.
"वाईन हा शब्द उच्चारला की सर्वसामान्य नागरिकांना वाईन हे मद्य असल्याचे वाटते. परंतु, द्राक्षापासून तयार होणारी वाईन हे मद्य नाही तर ते आरोग्यासाठी अल्प प्रमाणात घेत असल्यास फायद्याचे आहे, असं मत द्राक्षापासून वाईन तयार करणाऱ्या उद्योजकांचं आहे. त्यामुळेच आता डाळिंबापासूनही वाईनचे उत्पादन घेण्यात यावे अशी मागणी जोर घरू लागली आहे.
नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादनासोबतच कसमा पट्ट्यात निर्यातक्षम डाळींबाचंही उत्पादन घेतलं जातं. डाळींब हे रक्तवाढीसाठी चांगलं फळ असल्याचं समोर आलं आहे. मात्र नैसर्गिक आपत्तीत डाळींब उत्पादकांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे डाळींबं खराब होतात. शिवाय डाळींब उद्योगावर प्रोसेसिंग प्रक्रिया उद्योग नाही. त्यामुळे डाळींबापासून वाईन उत्पादनाची परवानगी मिळावी. असे झाले तर डाळींब उत्पादकांच्या निर्यात न होणाऱ्या मालाचा उपयोग यात करता येईल, असं शेतकऱ्यांचं मत आहे.
झाडावर पूर्ण पिकलेल्या डाळींबात साखर उतरण्याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळं त्यात अल्कोहोल पण काही प्रमाणात उतरत असतं. त्यामुळे केवळ प्रोसेसिंग करुन तयार होणारे ज्यूस किंवा वाईन उत्पादन करण्यास परवानगी मिळाल्यास डाळींब उत्पादकांना त्याचा फायदा होईल अशी माहिती वाईन उत्पादक बाळासाहेब बागुल यांनी दिली.
यापूर्वीसुध्दा वाईन विक्री होत होती. मात्र आता ती किराणा दुकानात विक्रीला ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे अडचणीत असलेल्या लहान वायनरी उद्योगाला आणि द्राक्ष उत्पादकांना दिलासा मिळणार असल्याचे शेतकरी सांगतात.
महत्वाच्या बातम्या
- Wine : किराणा दुकानातून वाईन विक्री करणार नाही; नागपूरमधील चिल्लर किराणा व्यापारी संघटनेचा निर्णय
- Video : पालिकेच्या विशेष सभेत सिगारेटचे झुरके; काँग्रेसच्या नगरसेवकाचा प्रताप
- नाना पटोले यांनी मानसिक उपचार करून घ्यावेत; चंद्रशेखर बावनकुळे यांचा हल्लाबोल
- Pegasus : पेगासस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल ; भारत-इस्रायल संरक्षण कराराच्या चौकशीची मागणी