एलन मस्क म्हणाले, ट्विटरच्या सीईओ पदावरून पायउतार होऊ का, जयंत पाटील म्हणतात, आधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटचा निकाल द्या!
Jayant Patil On Elon Musk : ट्विटरच्या सीईओ पदावरुन पायउतार होऊ का, असा सवाल एलन मस्क यांनी विचारला आहे. परंतु, जयंत पाटील यांनी थेट मस्क यांनाच महाराष्ट्र कर्नाटक सीमावादातच ओढलं आहे.
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा (Maharashtra Karnataka border dispute ) वादावरून सध्या दोन्हीकडील वातावरण चांगलच तापलं आहे. त्यातंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटरवरून वाद निर्माण झालाय. परंतु, दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मात्र हे ट्विट बसवराज बोम्मई यांनी केले नाही असे म्हटले आहेत. यावरूनच आता राष्ट्रवादेचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी ट्विटरचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) यांना टॅग करत हे ट्विट नक्की कोणी केले आहे? याचा निकाल द्यावा असे म्हटले आहे.
ट्विटरच्या सीईओ पदावरुन पायउतार होऊ का, असा सवाल एलन मस्क यांनी विचारला आहे. परंतु, जयंत पाटील यांनी थेट मस्क यांनाच महाराष्ट्र कर्नाटक सीमावादातच ओढलं आहे. जयंत पाटील यांच्या या ट्विटची आता राज्यभर चर्चा सुरू झालीय.
Jayant Patil On Elon Musk : काय म्हटले आहे जयंत पाटील यांनी?
"कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक आणि महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. एलन मस्क आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे? असे जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेले ट्विट त्यांनी केलेले नाही, असे कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री सांगतात. @elonmusk , आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून वरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे ? https://t.co/bmTMkjTOkv
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 19, 2022
महाराष्ट्रच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली असली तरी त्याने काही फरक पडणार नाही. महाराष्ट्राने यापूर्वीही असा प्रयत्न केला आहे. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. सुप्रीम कोर्टात आमची कायदेशीर बाजू मजबूत आहे. आमचं सरकार सीमावादावर कोणतीही तडजोड करणार नाही. असं ट्विट बसवराज बोम्मई यांनी केलं होतं. परंतु, त्यानंतर त्यांनी हे ट्विट आपण केले नसल्याचे सांगितले होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हे ट्विट बोम्मई यांनी केले नव्हते असे सांगितले आहे. त्यामुळेच जयंत पाटली यांनी आता थेट मस्क यांना टॅग करत हे ट्विट नक्की कोणी केले हे सांगा असे म्हटले आहेत. एलॉन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देण्याबाबत ट्विक केल्याने जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, आपण ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होण्यापूर्वी काय तो नक्की निकाल द्या, हे ट्विट नक्की कोणी केले आहे?
दरम्यान, एलन मस्क यांनी पोल घेत नेटकऱ्यांना विचारलंय की, 'मी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसं मी करेन.' मस्क यांच्या या ट्विटनंतर जंयत पाटील यांनी त्यांना ट्रग करत ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार होण्याआधी कर्नाटच्या मुख्यमंत्र्यांच्या ट्विटचा निकार द्या असे म्हटले आहे.