Amravati Municipal Commissioner: मनपा आयुक्तांवर शाईफेक करणाऱ्यांना खासदार नवनीत राणांसह आमदार रवी राणांचे समर्थन
अमरावतीमध्ये राजापेठ उड्डाणपूल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्यानंतर आज तेथील मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाही फेकल्याची घटना घडली.
![Amravati Municipal Commissioner: मनपा आयुक्तांवर शाईफेक करणाऱ्यांना खासदार नवनीत राणांसह आमदार रवी राणांचे समर्थन Navneet Rana and ravi rana supports Who Throwes Ink on Amravati Municipal Commissioner pravin aashtikar Amravati Municipal Commissioner: मनपा आयुक्तांवर शाईफेक करणाऱ्यांना खासदार नवनीत राणांसह आमदार रवी राणांचे समर्थन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/09/3ce11261331dff936f62a43015675a10_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Amravati News : अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपूल या 12 जानेवारीला आमदार रवी राणा यांनी महापालिकेच्या परवानगीशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. दरम्यान हा पुतळा अनधिकृतपणे बसवण्यात आल्याने मनपा आयुक्तांनी संबधित पुतळा रात्रीच्या सुमारास काढला. ज्यानंतर आता स्वतःला शिवप्रेमी म्हणवणाऱ्या काहींनी मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर (pravin Ashtikar) यांच्या अंगावर शाही फेकत निषेध व्यक्त केला. दरम्यान शाई फेकणारे नेमके कोण होते, हे अजून कळाले नसले तरी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दोघांनीही संबधितांना पाठिंबा दिला आहे.
नवनीत राणा यांनी एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली की, ''मला आयुक्तांवर झालेल्या शाईफेकीची बातमी समजली. हा शिवभक्त आणि शिवप्रेमींचा राग बाहेर आला असून मी या शिवभक्तांच्या पाठीशी उभी आहे. कारवाई करण्याआधी त्या प्रकरणाची पूर्ण माहिती आयुक्तांनी घ्यायला पाहिजे होती. आम्ही तीन वर्षांपासून पुतळा बसवण्याची परवानगी मागत होतो, पण न मिळाल्याने अखेर हा पुतळा बसवला. पण अर्ध्या रात्री अशाप्रकारे पुतळा हटवल्याने त्याच दिवसापासून शिवभक्तांच्या मनात राग होता. जो आज निघाला.''
आष्टीकर पैसे देऊन अमरावतीचे आयुक्त झाले आहेत - रवी राणा
दुसरीकडे आमदार रवी राणा यांनी या शाईफेक प्रकरणावर बोलताना घडलेल्या घटनेचा मी समर्थन अजिबात करत नाही. पण मनपा आयुक्तांनी शिवप्रेमींचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर हे पैसे देऊन अमरावती महानगरपालिकेमध्ये आयुक्तपदी आले आहेत. तसंच मागील दोन महिन्यांपासून आयुक्त तीन टक्के कमिशन घेऊन फाईल क्लियर करून देत असल्याची टीकाही आमदार रवी राणा यांनी आयुक्त आष्टीकर यांच्यावर केली आहे.
इतर बातम्या :
- Amravati : मनपा आयुक्तांवर शाईफेक, 'हे' प्रकरण भोवल्याची चर्चा
- Wardha HinganGhat Case : हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी विकेश नगराळे दोषी; फाशी की जन्मठेप? उद्या निकाल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)