एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच असेल, काँग्रेस बैठकीनंतर नाना पटोलेंचं वक्तव्य

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येऊन काँग्रेसच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं. यूपीए आहेच कुठे? असा सवाल विचारत काँग्रेसची कोंडी केली.

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  (Mamata Banerjee) मुंबईत आल्या आणि त्यांनी काँग्रेसला डिवचलं. त्यामुळे गेल्या काही दिवसात राज्यात शांत असलेली काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आग्रही आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येऊन काँग्रेसच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं. यूपीए आहेच कुठे? असा सवाल विचारत काँग्रेसची कोंडी केली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत हे सगळ घडल्यानंतर आता काँग्रेस आक्रमक होत आहे.  आता विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे.

दहा महिन्यापूर्वी नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून राज्यातील विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे. मधल्या काळात झालेल्या दोन अधिवेशनात हंगामी अध्यक्षांनी काम पाहिलं. अध्यक्षपदाची निवड तातडीने व्हावी यासाठी काँग्रेस सातत्याने मागणी करत आहे परंतु आतापर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादीने काँग्रेसच्या या मागणीकडे फारसं गांभीर्याने घेतलं नाही.  याच मुद्द्यावरून भाजपही काँग्रेसला चिमटा काढते. 

  • महाविकास आघाडीचे संख्याबळ

शिवसेना - 56
राष्ट्रवादी - 53
काँग्रेस - 43
तिन्ही पक्षांचे मिळून - 152

  • महाविकास आघाडीला पाठिंबा असलेले पक्ष

बहुजन विकास आघाडी - 3
समाजवादी पार्टी - 2
प्रहार जनशक्ती पार्टी - 2
माकप - 1
शेकाप - 1
स्वाभिमानी पक्ष - 1
क्रांतिकारी शेतकरी पार्टी - 1
अपक्ष - 8
एकूण - 171

विरोधकांकडे असलेले संख्याबळ

भाजप - 106
जनसुराज्य शक्ती - 1
राष्ट्रीय समाज पक्ष - 1
अपक्ष - 5
एकूण - 113

तटस्थ

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 1
एमआयएम - 2

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली तर महाविकास आघाडीकडे पुरेसं संख्याबळ आहे. पण या निवडणुकीत गुप्त मतदान झालं तर दगाफटका होऊ शकतो. त्यामुळेच ही निवडणूक आवाजी मतदानाने व्हावी यासाठी येत्या अधिवेशनात विधेयक मांडले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ममता बॅनर्जी यांचा काँग्रेसवरील राग, महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून मिळणारी काँग्रेसला दुय्यम वागणूक या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर असतो. त्यामुळेच आता आधी अध्यक्षपदाची निवडणूक घ्या आणि मगच पुढे जा असा आक्रमक सूर काँग्रेसन आळवलाय. आत्तापर्यंत दोन अधिवेशनात तरी काँग्रेसच्या या मागणीला मित्र पक्षांनी फारसं गांभीर्याने घेतलं नाही. आता किमान हिवाळी अधिवेशनात तरी अध्यक्षपदाची निवडणूक होते की पुन्हा एकदा काँग्रेसला गृहीत धरलं जातं हे पाहणे महत्त्वाचे आहे.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
Raveena Tandon : ब्रेकअप होताच दुसरी शोधून आठवड्याला एंगेज व्हायचा, सुष्मिता सेन आणि रेखासोबत रंगेहाथ पकडलं; रवीना टंडनने सुपरस्टारची दुसरी बाजू समोर आणली!
ब्रेकअप होताच दुसरी शोधून आठवड्याला एंगेज व्हायचा, सुष्मिता सेन आणि रेखासोबत रंगेहाथ पकडलं; रवीना टंडनने सुपरस्टारची दुसरी बाजू समोर आणली!
Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
Celebrity Got Engaged But Never Got Married : 'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Mhaske on Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांच्यासाठी कोणतंही पद मागितलेलं नाहीABP Majha Headlines :  12 PM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सPune Helmet Compulssion:  पुण्यात हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचं समोरCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 11 AM : 2  डिसेंबर 2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
मालेगाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाची व्याप्ती वाढली, 120 नव्हे 1200 कोटींची अफरातफरी, ईडी तपासात धक्कादायक माहिती समोर
Raveena Tandon : ब्रेकअप होताच दुसरी शोधून आठवड्याला एंगेज व्हायचा, सुष्मिता सेन आणि रेखासोबत रंगेहाथ पकडलं; रवीना टंडनने सुपरस्टारची दुसरी बाजू समोर आणली!
ब्रेकअप होताच दुसरी शोधून आठवड्याला एंगेज व्हायचा, सुष्मिता सेन आणि रेखासोबत रंगेहाथ पकडलं; रवीना टंडनने सुपरस्टारची दुसरी बाजू समोर आणली!
Ajit Pawar : अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
अजित पवारांचा 'सोनेरी काळ' सुरु, शरद पवारांपाठोपाठ ठाकरेंचा बडा 'हिरा' गळाला लावला
Celebrity Got Engaged But Never Got Married : 'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
'या' 10 सेलिब्रिटी जोडप्यांनी साखरपुडा धुमधडाक्यात केला, पण लग्नाची वेळ येताच प्रेमाच्या नात्याचीच माती झाली!
Nana Patole:  बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर आणखी एक गंभीर आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग
Maharashtra New CM: सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
सगळेजण मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत गुंतून पडले, फडणवीसांनी पडद्यामागे शपथविधीचा पूर्ण प्लॅन रचला
Malaika Arora and Remo Dsouza Dance Video : मलायका अरोराचा जमिनीवर झोपून नको त्या मूव्हजमध्ये रेमोसोबत मादक डान्स; गीता माँ जागेवर भडकली! म्हणाली, आता खूप झालं!
Video : मलायका अरोराचा जमिनीवर झोपून नको त्या मूव्हजमध्ये रेमोसोबत मादक डान्स; गीता माँ जागेवर भडकली! म्हणाली, आता खूप झालं!
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
विधानसभेच्या निकालानंतर पहिला झटका, शरद पवारांचा मोहरा 'तुतारी' खाली ठेवणार, अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Embed widget