(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संजय राऊत पात्रता ओळखून बोला, तुम्ही आणि तुमचा मालक मागच्या दाराने निवडून आलेत, गिरीश महाजनांचा हल्लाबोल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) काय आहे? हे सर्व देशाला माहिती आहे. तुम्ही तुमची पात्रता ओळखून बोला अशी टीका मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर केली.
Girish Mahajan on Sanjay Raut : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) काय आहे? हे सर्व देशाला माहिती आहे. तुम्ही तुमची पात्रता ओळखून बोला अशी टीका मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर केली. संघाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही असेही महाजन म्हणाले. संजय राऊत तुम्ही साधे नगरसेवक म्हणून तरी निवडून आलात का? तुम्ही आणि तुमचा मालक मागच्या दाराने निवडून आल्याचे महाजन म्हणाले.
संजय राऊत तुम्ही साधे नगरसेवक म्हणून तरी निवडून आलात का?
संजय राऊत यांना उठता बसता देवेंद्र फडणवीस दिसत असल्याचे गिरीश महाजन म्हणाले. जाणीवपूर्वक राऊत फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. सूर्यावर थुंकले तर ते स्वत:च्या तोंडावर पडते असेही गिरीश महाजन म्हणाले. देवेंद्र फडणवीस हे पाच पाच वेळा निवडून आले आहेत. संजय राऊत तुम्ही साधे नगरसेवक म्हणून तरी निवडून आलात का? असा सवाल महाजन यांनी केला.
संजय राऊत यांना बडबड करण्याशिवाय काहीही काम उरलं नाही.
दरम्यान, भाजप नेते प्रविण दरेकर यांनी देखील संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत यांना बडबड करण्याशिवाय काहीही काम उरलेलं नाही. रोज उठतात काही ना काही बोलतं असतात. जनता या निवडणुकीत त्यांना आलेला अहंकार उतरवेल असे दरेकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, भौकनेवाले कुत्ते कभी काटते नही. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत राष्ट्रीय अध्यक्षपदाची चर्चा असणं, यात चुकीच काहीच नाही. पण जर तर वर बोलायचं नसतं त्याला काही अर्थ नसतो असे दरेकर म्हणाले.
संजय राऊत स्वतः च्या बळावर थेट निवडून येऊ शकत नाहीत : आमदार परिणय फुके
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवर भाजप नेते आमदार परिणय फुके यांनी प्रतिहल्ला चढवला आहे. विरोधकांना राज्यातील विकास कामावरून जनतेचे लक्ष विचलित करायचे आहे,.म्हणून काल परवा अनिल देशमुख बोलले, आता संजय राऊत बोलत आहेत. ते काहीही बोलून महाराष्ट्राचे लक्ष विकास कामावरून भरकटविण्याचे प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संजय राऊत स्वतः च्या बळावर थेट निवडून येऊ शकत नाही असेही फुके म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत?
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या नादी लागणार म्हणजे काय करणार, पोलिसांना, ईडी किंवा सीबीआयला आमच्या मागे लागणार. फडणवीसांना कोणी म्हटलं आमच्या नादी लागू नका. लोकसभा निवडणुकीत ते आमच्या नादी लागले आणि त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा आमच्या नादी लागावेच, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते गुरुवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी लफंग्या टोळीला हाताशी धरुण दळभद्री राजकारण सुरु केले. त्यामुळे आज महाराष्ट्राची ही अवस्था आहे. उद्धव ठाकरे यांनी, एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तलवार उपसली आहे. ते फडणवीसांना तुम्ही नाही तर तू असे एकेरीत बोलले. देवेंद्र फडणवीस हे संघाच्या विचारांचे आहेत. पण त्यांनी आजपर्यंत कोणती संस्कृती, कोणते नीतीनियम पाळले? जे संघाला नीतिमान आणि प्रखर राष्ट्रवादी मानतात त्यांना मी देवेंद्र फडणवीस यांचे उदाहरण देतो. माणूस किती क्रूर, भ्रष्ट आणि अनितीमान असतो, हे फडणवीसांकडे पाहून कळते. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कपटी आणि कारस्थानी लोकांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बदनाम झाला, असे संजय राऊत यांनी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
Sanjay Raut: संजय राऊतांची फडणवीस आणि शिंदेंवर शेलक्या भाषेत टीका, म्हणाले, आमच्या नादी लागूनच दाखवा!