एक्स्प्लोर

Sanjay Raut: संजय राऊतांची फडणवीस आणि शिंदेंवर शेलक्या भाषेत टीका, म्हणाले, आमच्या नादी लागूनच दाखवा!

Maharashtra Politics: संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका. ईडी आणि सीबीआयची कवचकुंडलं बाजूला ठेवून लढा आम्ही तुम्हाला 20 फूट खाली गाडल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

नवी दिल्ली: देवेंद्र फडणवीस म्हणतात की, मी कोणाच्या नादी लागत नाही आणि माझ्या नादी कोणी लागलं तर मी सोडत नाही. पण आता देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या नादी लागूनच दाखवावे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि फडणवीसांना आव्हान दिले. फडणवीस (Devendra Fadnavis) आमच्या नादी लागणार म्हणजे काय करणार, पोलिसांना, ईडी किंवा सीबीआयला आमच्या मागे लागणार. फडणवीसांना कोणी म्हटलं आमच्या नादी लागू नका. लोकसभा निवडणुकीत ते आमच्या नादी लागले आणि त्यांचा पराभव झाला. त्यामुळे आता त्यांनी पुन्हा आमच्या नादी लागावेच, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते गुरुवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांनी भाजप, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली. देवेंद्र फडणवीस नामर्द, लफंगे आणि #$ लोकांची टोळी घेऊन आमच्या नादी लागणार आहेत का? तुमच्याकडे तेवढी छाती आणि हिंमत नाही. तुमच्यात हिंमत असेल तर ईडी आणि सीबीआयची कवचकुंडलं बाजूला ठेवून लढा आम्ही तुम्हाला 20 फूट खाली गाडल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. 

यावेळी संजय राऊत यांनी शिंदे गटातर्फे विधानसभा निवडणुकीसाठी सुरु करण्यात आलेल्या "ताई, माई, अक्का" या मोहिमेविषयी विचारण्यात आले. तेव्हा संजय राऊत यांनी शिंदे गटाला डिवचताना अत्यंत शेलकी भाषा वापरली. जर मी म्हणालो की ताई माई अक्का माझा पक्ष *क्का, असे मी बोललो तर चालेल का? पण मी तसे बोलणार नाही, असे राऊतांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस क्रूर, अनितीमान आणि भ्रष्ट माणूस: संजय राऊत

महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या राजकारणात एका संस्कृतीचे पालन केले जात होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी लफंग्या टोळीला हाताशी धरुण दळभद्री राजकारण सुरु केले. त्यामुळे आज महाराष्ट्राची ही अवस्था आहे. उद्धव ठाकरे यांनी, एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात तलवार उपसली आहे. ते फडणवीसांना तुम्ही नाही तर तू असे एकेरीत बोलले. देवेंद्र फडणवीस हे संघाच्या विचारांचे आहेत. पण त्यांनी आजपर्यंत कोणती संस्कृती, कोणते नीतीनियम पाळले? जे संघाला नीतिमान आणि प्रखर राष्ट्रवादी मानतात त्यांना मी देवेंद्र फडणवीस यांचे उदाहरण देतो. माणूस किती क्रूर, भ्रष्ट आणि अनितीमान असतो, हे फडणवीसांकडे पाहून कळते. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कपटी आणि कारस्थानी लोकांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बदनाम झाला, असे संजय राऊत यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. याविषयी विचारले असता राऊतांनी त्यावर फारसे बोलणे टाळले. देवेंद्र फडणवीस यांना भाजपने आंतरराष्ट्रीय अध्यक्ष करावे. त्याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

VIDEO: संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

आणखी वाचा

महाराष्ट्रात फडणवीस असेपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांती लाभणार नाही, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य 

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Sanjay Raut: नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस, 17 सप्टेंबरनंतर कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय बघा: संजय राऊत
नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून शेवटचा वाढदिवस, 17 सप्टेंबरनंतर कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतंय बघा: संजय राऊत
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Sapkal : थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
थोडी तरी लाज शिल्लक असेल तर सरकारने तातडीनं सुप्रीम कोर्टात जावं; डॉ. नरेंद्र दाभोळकर प्रकरणी हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis and Rahul Gandhi: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाला फक्त काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेस नेत्यांच्या महाविद्यालयातील मुलींनाच प्रवेश, देवेंद्र फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Embed widget