Sangli Crime : मिरजेत दोन सख्ख्या भावांच्या कुटुंबातील 9 जणांची सामूहिक आत्महत्या, मृतांमध्ये डॉक्टर, शिक्षकाचा समावेश
मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील अंबिका नगर भागामध्ये 2 कुटूंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन घरात जवळपास नऊ मृतदेह सापडले असल्याची माहिती आहे.

Sangli Crime : मिरज तालुक्यातील म्हैसाळ मधील अंबिका नगर भागामध्ये 2 कुटूंबातील 9 जणांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन घरात जवळपास नऊ मृतदेह सापडले असल्याची माहिती आहे. मिरज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
म्हैसाळ येथील माणिक यल्लाप्पा व्हनमोरे आणि पोपट यल्लपा होनमोरे या दोन भावाच्या कुटुंबातील 9 जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही. घटनास्थळी पोलिस व ग्रामस्थांनी गर्दी केली आहे. संपूर्ण सांगली जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे.
मृतांमध्ये आई, पत्नी आणि मुलांचाही समावेश आहे. सोमवारी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर घटना उघडकीस आली. माणिक वनमोरे आणि पोपट वनमोरे दोघे वेगवेगळ्या घऱात राहत होते. दोघांनी आपल्या कुटुंबासह एकाच वेळी आत्महत्या केली. एका ठिकाणी सहा जणांचे तर दुसऱ्या ठिकाणी तिघांचे मृतदेह आढळले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ माजली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
