एक्स्प्लोर

Maharashtra Weather: राज्यात आजपासून 4-5 दिवस पावसाची शक्यता, मुंबई, रत्नागिरीला यलो अलर्ट, इतर भागातील स्थिती जाणून घ्या

Maharashtra Weather Update : आजपासून राज्यात पुढील 4-5 दिवस पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्राला (Maharashtra) पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे, आजपासून राज्यात पुढील 4-5 दिवस पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. यानुसार कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात (Marathwada) पावसाची शक्यता आहे. तर 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे.


25-26 नोव्हेंबरला मुंबईसाठी यलो अलर्ट

25 आणि 26 नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी यलो अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच मुंबईत पावसाचा अंदाज असल्याने हवा गुणवत्ता पातळी चांगली होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता तर उत्तर महाराष्ट्रात देखील विजांच्या गडगडाटासह पाऊस असेल. सोबतच, उत्तर महाराष्ट्रात अगदी तुरळक ठिकाणी गारा पडण्याची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे. रब्बीच्या हंगामात शेतकऱ्यांचा पुन्हा अवकाळीशी सामना होणार आहे. 


बदलत्या वातावरणाचा परिणाम आंबा पिकांवर 

रत्नागिरी जिल्ह्याला उद्यापासून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त माहितीनुसार जिल्ह्याला 24 ते 26  नोव्हेंबर पर्यंत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या काळात जिल्ह्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. एकंदरीतच बदलत्या वातावरणाचा परिणाम हा आंबा पिकावर होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने अंदाज वर्तवला

स्कायमेटच्या म्हणण्यानुसार, तामिळनाडू किनारपट्टीवर पाऊस पाडणारा पूर्वेकडील कुंड पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत आहे. लवकरच केरळ आणि लगतच्या भागात पोहोचेल. दरम्यान, मुंबईत 25 ते 26 नोव्हेंबर दरम्यान काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की, २४ नोव्हेंबरलाही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. 25 आणि 26 नोव्हेंबर रोजी संपूर्ण शहरात चांगला पाऊस पडू शकतो, 27 नोव्हेंबर रोजी पावसात घट होईल. 

 

या राज्यांमध्येही पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम देशातील हवामानावर दिसून येत आहे. राज्यासह देशातील वातावरण बिघडले आहे. येत्या 24 तासांत देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज आणि उद्या अनेक भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे. केरळ, माहे, अंदमान आणि निकोबार बेटांवर आणि तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये वेगळ्या ठिकाणी लक्षणीय पावसाची नोंद झाली. आज कोझिकोड, तिरुवनंतपुरम, कोट्टायम, इडुक्की, केरळचे त्रिशूर आणि तामिळनाडूच्या नागापट्टिनम, थुथुकुडी, कराईकलमध्ये पावसाची शक्यता आहे.

 

हेही वाचा: 

Devendra Fadnavis Full Speech Pandharpur : विकास आराखडा ते मंदिर संवर्धन, पंढरपूरसाठी नवं काय काय?

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सNarhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरणUday Samant : मराठी भाषेला त्रास देणाऱ्यांना... उदय सामंतांचं भाषण Pune Vishwa Marathi SammelanGunaratna Sadavarte On Suresh Dhas भाजप नेत्यांनी सुरेश धसांना समज द्यावा, त्यांच्यावर हक्कभंग आणावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Dhananjay Munde: भगवानगड आणि नामदेवशास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, नव्या आत्मविश्वासाने काम करेन: धनंजय मुंडे
माझ्या पाठिशी भगवानगड आणि न्यायाचार्यांची ताकद उभी राहिलेय, माझा आत्मविश्वास वाढलाय: धनंजय मुंडे
Accident : भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Embed widget