एक्स्प्लोर

पूर्वमोसमी पावसाचा जोर वाढला, अनेक भागात वादळी वाऱ्यासह वरुणराजाची जोरदार हजेरी, काही भागात पिकांना फटका

राज्यात पूर्वमोसमी पावसाचा (Rain) जोर वाढला आहे. विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, या पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांची सुटका झाली आहे.

Maharashtra Rain : राज्यात पूर्वमोसमी पावसाचा (Rain) जोर वाढला आहे. विविध भागात जोरदार पाऊस सुरु आहे. दरम्यान, या पावसामुळं उष्णतेपासून नागरिकांची सुटका झाली आहे. पण दुसऱ्या बाजुला या पूर्वमोसमी पावासाचा काही भागात शेती पिकांना देखील फटका बसला आहे. त्यामुळं सध्या काही भागातील शेतकरी चिंतेत आहे. जाणून घेऊयात राज्यात कुठे कुठे पावसानं हजेरी लावली.

नांदेडमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी  पावसाची हजेरी

नांदेडमध्ये आज सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी रात्री नांदेडला अवकाळी पावसाने झोडपून काढले होते. त्यानंतर आज देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाने सखल भागात पाणी साचल्याने मनपाचे पितळ उघडे पडलं आहे.

परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पाऊस 

परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तीन दिवसानंतर पुन्हा एकदा परभणी शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये आज सायंकाळच्या सुमारास वादळी वारे विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. परभणीसह मानवत गंगाखेड पूर्णा तालुक्यात जोरदार वादळी वारे विजा आणि पाऊस झाला आहे. ज्यामुळं वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. मानवत तालुक्यात तर पावसाचा जोर एवढा होता की मोठ्या प्रमाणावर शेतामध्ये पाणी साचले आहे.

बीडमध्ये पावसामुळं 25 एकर क्षेत्रावरील कांदा बाधित 

बीड तालुक्यातील कुटेवाडी शिवारात झालेल्या पावसाने 25 एकर क्षेत्रावरील कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. मागील चार दिवसांपासून सतत पावसाची हजेरी आहे. याचा परिणाम काढणीला आलेल्या पिकांवर पाहायला मिळतोय. कांद्यासह उन्हाळी ज्वारीचे देखील पावसात प्रचंड नुकसान झालंय. पंचनामे करून मदत मिळावी अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यात जोरदार पाऊस, वीज पडल्याने 7 बकऱ्या दगावल्या

हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील गुगुळ पिंपरी शिवारात अवकाळी पावसात वीज पडल्याने 7 बकऱ्या दगावल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून त्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये काल मोठ्या प्रमाणामध्ये वादी वारे आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला होता. दरम्यान गुगुळ पिंपरी शिवारात संबंधित शेतकरी सायंकाळच्या सुमारास बकऱ्या घेऊन घराच्या दिशेने जात असताना अचानक वीज पडल्याने या सात बकऱ्या दगावल्याची ही घटना घडली आहे.

वाशिमच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा आक्रोश, दिल्लीतून केंद्रीय कृषी मंत्र्यांचा थेट फोन, मदतीचं आश्वासन

वाशिमच्या मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेलं भुईमुगाचे पीक मुसळधार पावसामुळं संपूर्ण वाहून गेल्याच्या घटनेला दोन दिवस झाले. गौरव पवार यांनी आपले पीक वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. मात्र, वळीवाच्या जोरदार पावसाने काही क्षणातच त्यांच्या मेहनतीचे पाणी झालं आणि  पीक वाहून गेलं होतं. या  गंभीर घटनेची दखल घेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी थेट दिल्लीहून वाशिम जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यांनी तात्काळ या शेतकऱ्याला नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने गौरव पवार यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. आज गौरव पवार यांना बाजार समितीकडून मदत दिली जाणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

कुठं उन्हाचा तडाखा तर कुठं मुसळधार पावसाचा इशारा, पुढील 4 ते 5 दिवस कसं असेल हवामान? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report
Wedding Fight : लग्नाचा मंडप की कुस्तीचा फड? अजब लग्नांच्या गजब कहाण्या Special Report
Godwoman Defrauded : माझाची काठी, वसूल 14 कोटी, माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट Special Report
IndiGo Plane : इंडिगो जमिनीवर, खोळंब्याचा टेक ऑफ, सेवा विस्कळित का झाली? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
'माझी बायको पूनमला सुद्धा पाण्यात बुडवून तडफडून ठार मारली पाहिजे' पोटच्या शुभमसह चार निष्पाप लेकरांना बुडवून मारणाऱ्या क्रुर बायकोचा चेहरा समोर येताच नवरा हादरला
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
लोकशाही संपली.. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय का? उत्तम जानकरांचा सवाल, जयकुमार गोरेंना आर्चीचा उपमा
Crime News: नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
नवऱ्याला मारून नीळ्या ड्रममध्ये भरणाऱ्या मुस्कानची इच्छा ऐकून भुवया उंचावल्या; प्रियकराला दाखवायचाय झालेल्या मुलीचा चेहरा!
Amol Mitkari on Ajit Pawar CM: मोठी बातमी : पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
Maharashtra CM: पृथ्वीबाबांचं वक्तव्य गंभीर, द्विवर्षपूर्तीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होणार? मिटकरींच्या दाव्याने खळबळ
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
इंडिगो एअरलाईन्सचं प्रवाशांसोबत धक्कादायक कृत्य, नागपुरातून पुण्याला निघालेल्या प्रवाशांना हैदराबादला नेऊन सोडलं, एक तास डांबून ठेवलं
Pune Crime News: पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
पुण्यात भरदिवसा जादूटोणा? बंद घराच्या दारात दही, भात, लिंबू ठेवून नारळ फोडलं; परिसरात खळबळ
Embed widget