एक्स्प्लोर

Eknath Khadse : राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून भाजपचे कमळ हातात घेणार? खडसेंनी स्पष्टच सांगितले

Eknath Khadse : आपण भाजपात जाणार असल्याची चर्चा निरर्थक असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिले.

Eknath Khadse : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबत फोनवर चर्चा केल्यानंतर त्यांच्या घरवापसीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ सोडून पुन्हा एकदा भाजपचे कमळ हाती घेणार असल्याची चर्चा जोरात सुरू झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी या चर्चा निरर्थक असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. ज्यांनी आपल्याला आधार दिला, त्यांना सोडून जाण्याचा विचार करता येणार नसल्याचेही सांगत खडसे यांनी चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी सांगितले की, गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत आपली भेट झाली नाही. काही वैयक्तिक कारणांसाठी दूरध्वनींवरून त्यांच्यासोबत चर्चा केली असल्याचे खडसे यांनी सांगितले. या चर्चेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती दिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांनी आपल्यासोबत शाह यांची भेट घेण्यास सांगितले असल्याचेही त्यांनी सांगितले. शरद पवार जर स्वतः आपल्या सोबत अमित शहा यांच्याकडे माझ्या सोबत येणार आहेत तर ते त्यांना मला भाजपमध्ये घ्या हे सांगण्यासाठी तर येणार नाही असा उपरोधिक सवालही त्यांनी केला. 

राष्ट्रवादी सोडून जाण्याचा प्रश्न नाही

राष्ट्रवादी काँगेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा कोणताही प्रश्नच नसल्याचे खडसे यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. भाजपमध्ये 40 वर्ष काम केले. पक्षवाढीसाठी मोठे कष्ट केले, महत्त्वाची पदेदेखील भूषवली. मात्र, मधल्या कालखंडात माझ्यावर अन्याय होत असल्याचे मला वाटत होते. मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. या सगळ्या कोंडीनंतर त्यानंतर भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. त्यानंतरच्या काळात राजकारणापासून तीन वर्षे दूर होतो. राजकारणातून जवळपास बाहेर गेल्यानंतर शरद पवार यांनी मदतीचा हात दिला. त्यांनी विधान परिषदेत निवडून आणले. ज्यांनी मला राजकीय विजनवासातून बाहेर काढले , त्या पक्षाला कसे सोडू असा सवाल त्यांनी केला. 

शिंदे गटाला चपराक

दसरा मेळावा बाबत हायकोर्टाने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने दिलेला निकाल हा योग्य असून एक प्रकारे शिंदे गटाला ही चपराक असल्याची प्रतिक्रिया ही खडसे यांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात संबोधित करत आहेत. त्याच ठिकाणी आपल्याला दसरा मेळावा घ्यायचा आहे असा आग्रह धरणे आणि त्यासाठी न्यायालयात जाणे हा प्रकार अतिशय दुर्दैवी असल्याचेही त्यांनी सांगितले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi : चुका होत राहतात, मी माणूस आहे देव नाही- नरेंद्र मोदी ABP MajhaDevendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP MajhaMVA Internal issue : एकमेकांविरोधात आघाडी, महाविकास आघाडीत बिघाडी Rajikya Shole Special ReportSharad Pawar NCP | शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? Special Report Rajkiya Shole

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
Embed widget