(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Anil Deshmukh : अनिल देशमुखांना रुग्णालयातून डिस्चार्ज, सीबीआय ताब्यात घेण्याची शक्यता
Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र सध्या त्यांच्यावर शस्त्रक्रियेची गरज नसून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
Anil Deshmukh Discharged From Hospital : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात तुरुंगात पाय घसरुन पडल्यानं देशमुखांच्या खांद्याला दुखापत झाली होती त्यामुळे देशमुखांना जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डिस्चार्ज दिल्यामुळे आता 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात चौकशीसाठी अनिल देशमुखांची सीबीआय ताब्यात घेण्याची शक्यता आहे. सध्या त्यांची रवानगी ऑर्थर जेल रोड कारागृहात करण्यात आली आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना उपचारासाठी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र शस्त्रक्रिया करण्याची सध्या गरज नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. डॉक्टरांनी त्यांना फिजीओथेरपी घेण्याचा सल्ला दिला आहे. शस्त्रक्रियेचा निर्णय 10 - 12 दिवसांनी घेण्यात येणार आहे. अनिल देशमुखांची सीबीआय ताब्यात घेण्याची शक्यता आहे. या अगोदर सीबीआयने सचिन वाझे, संजीव पालंडे आणि कुंदन शिंदे यांची कस्टडी घेतली होती.
कारागृहात चालताना पडल्याने अनिल देशमुख यांच्या खांद्याला मार लागला होता. त्यामुळं अनिल देशमुख यांना उपचारासाठी शुक्रवारी दाखल करण्यात आले होते. जे जे रुग्णालयाच्या मुख्य अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितलं आहे की, अनिल देशमुख यांना शनिवारी जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या ते अस्थिव्यंग विभागात दाखल आहेत. आज त्यांचा एमआरआय करण्यात आले.
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये आरोप केला होता की, राज्याचे तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना शहरातील रेस्टॉरंट आणि बारमधून दरमहा 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये देशमुख यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. देशमुख यांनी आरोप फेटाळून लावले होते पण मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर राजीनामा दिला होता.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha