एक्स्प्लोर

Maharashtra Live Updates: भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेऊ शकत नाही; शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Live Blog Breaking: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहा एका क्लिकवर. राज्यभरात पावसाची स्थिती कशी?

LIVE

Key Events
Maharashtra Live Blog Breaking news Live updates todays news 17 June 2025 Maharashtra Rain news weather Iran Israel war Maharashtra Live Updates: भाजपसोबत गेलेल्या संधीसाधूंना सोबत घेऊ शकत नाही; शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live Blog
Source : ABPLIVE AI

Background

अहमदाबाद दुर्घटनेत विमानातील सिनिअर क्रू असलेली मुलुंडच्या श्रद्धा धवन यांचा मृत्यू झाला होता. सोमवारी रात्री अहमदाबाद वरून त्यांचा मृतदेह मुलुंड मधील निवासस्थानी आणण्यात आला. यावेळी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी कल्पनगरी सोसायटी तसेच आसपासच्या नागरिकांनी गर्दी केली होती. या वेळी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. सोसायटीमध्ये अंतिम दर्शन करून नंतर त्यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.

17:50 PM (IST)  •  17 Jun 2025

महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९ मंजूर

 राज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या “महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९” या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.   बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धिमत्ता (Generative Al), इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoTs), ड्रोन, संगणकीय दृष्टिक्षमता (Computer Vision), रोबोटिक्स आणि पूर्वानुमान विश्लेषण (Predictive Analytics) यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या मदतीने शाश्वत व विस्तारयोग्य (scalable) उपाययोजना राबविता येणार आहेत. राज्यातील ॲग्रीस्टॅक, महा-ॲग्रीस्टेक, महावेध, क्रॉपसॅप, ॲगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डिबीटी यांसारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी त्रिस्तरीय प्रशासकीय संरचना असेल. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पहिल्या तीन वर्षांसाठी ५०० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल.  कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्र वेगाने बदलणारे आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात या धोरणामध्ये आवश्यक ते बदल / सुधारणा करण्यात येतील.  त्यासाठी राज्यस्तरीय सुकाणू समिती,  राज्यस्तरीय तांत्रिक समिती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अॅग्रीटेक नाविन्यता केंद्र, कृषि विद्यापीठांतर्गत कृषि कृत्रिम बुध्दिमत्ता संशोधन व नाविन्यता केंद्र काम करतील.
 या धोरणाच्या माध्यमातून राज्यात कृषि क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता व नाविन्यतेसाठी एक अग्रगण्य केंद्र निर्माण होईल. या धोरणामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा "शेतकरी-केंद्रित वापर", संशोधन, डेटा देवाण-घेवाण वाढेल,  स्टार्ट-अप्सना पाठबळ मिळेल आणि यातून महाराष्ट्र डिजिटल कृषि नाविन्यतेमध्ये आघाडीवर राहील, अशी अपेक्षा आहे.
 या धोरणाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा "शेतकरी-केंद्रित" वापर करण्यास स्टार्टअप्स, खाजगी कंपन्या / तंत्रज्ञान कंपन्या, कृषि विद्यापीठे, संशोधन संस्था, कृषि विज्ञान केंद्रे, खाजगी संस्था, शेतकरी / शेतकरी उत्पादक संस्था (FPOs) आदींना चालना मिळेल, असे उपक्रम हाती घेतले जातील.  यात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अॅग्रीटेक नाविन्यता केंद्राची संस्थात्मक उभारणी केली जाईल. हे केंद्र या धोरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी स्वतंत्र, पूर्णवेळ कार्यान्वयन यंत्रणा म्हणून कार्य करेल. ही यंत्रणा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत भागीदारी, नवकल्पनांना प्रोत्साहन, प्रकल्पांची निवड, अंमलबजावणी व अर्थसहाय्य, समन्वय, क्षमता बांधणी इ. धोरणांतर्गत विविध बाबींवर काम करेल. 
 आयआयटी / आयआयएस्सी सारख्या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील चार कृषि विद्यापीठांमध्ये कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता नाविन्यता आणि इनक्युबेशन केंद्र स्थापण्यात येतील. 
 डेटा-आधारित शेती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरासाठी उपयोगी ठरतील अशा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा उभारल्या जातील. या सुविधा राज्यव्यापी, सुरक्षित, सुसंगत व संमती-आधारित डेटा देवाण-घेवाण सुलभ करतील. क्लाऊड आधारित कृषि डेटा एक्स्चेंज (A-DeX) आणि सँडबॉक्सिंग सुविधा उपलब्ध केली जाईल, या डिजिटल प्लॅटफॉर्मशी केंद्र व राज्य शासनाचे शेती संबंधीत सर्व डेटाबेस जोडण्यात येतील (उदा. अॅग्रीस्टॅक, महावेध, महा-अॅग्रीटेक, क्रॉपसॅप, अॅगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डीबीटी इ.). या एक्स्चेंजद्वारे शेतकरी, त्यांची जमीन, पीक माहिती, स्थानिक हवामान, मृदा आरोग्य, इ. डेटा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्पांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. 
 कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम सुदूर संवेदन (Al-enabled Remote Sensing) आणि Geo-spatial Intelligence यांनी युक्त एकात्मिक इंजिन विकसित करण्यात येईल. याद्वारे उपग्रह प्रतिमा, ड्रोन सर्वेक्षण, UAVs आणि IoT आधारित उपकरणांद्वारे संकलित केलेल्या विविध स्रोतांतील स्थानिक माहितीचे विश्लेषण करून निर्णय घेण्यासाठी मदत करेल. ही प्रणाली MahaVedh, FASAL, Bhuvan इ. राष्ट्रीय व राज्य प्लॅटफॉर्मशी API द्वारे जोडण्यात येईल. या प्लॅटफॉर्मचा कृषि, जलसंपदा, महसूल व आपत्ती व्यवस्थापन इ. विभागांना विविध प्रयोजनांसाठी उपयोग करता येईल.

17:24 PM (IST)  •  17 Jun 2025

माझं कुणावर विशेष प्रेम नाही, माझं माझ्या पक्षावर प्रेम...गिरीश महाजन 

गिरीश महाजन 

आम्हाला ही पक्ष वाढवायचा आहे ..पालिका ताकतीने लढवायची अहे. .ज्यांना घेतले ते ही निवडून आले आहेत..काही जेष्ठ आहेत..आप आपसातले काही वाद असतील तर मिटतील 

आमच्याकडे मंत्री असलेल्ले अनेक जण मागच्या काळामध्ये टीका करत होते..मात्र आता एकरूप झाले आहेत आता कळत नाही ते दुसऱ्या पक्षात होते

आॅन बावनकुळे रविंद्र चव्हाण अनभिज्ञ

आमचं काही मिसकम्युनिकेशन झालं... हे मी मान्यच करतो… हरकत नही घरचा कार्यक्रम आहे.. त्यांनी मला तारीख माहित नाही असं बोलले असतील… कारण पक्षप्रवेश १-२ दिवसात होईल असं ठरलं होतं… मात्र लगेच झाल्याने गोंधळ झाला…

आॅन बडगुजर विशेष प्रेम

माझं कुणावर विशेष प्रेम नाही, माझं माझ्या पक्षावर प्रेम आहे आणि त्याच्या वाढीसाठी मी केलं 

आॅन संजय राऊत दाऊद आरोप

आतापर्यंत तुमच्या सोबत होते तेव्हा काय झाले..हे जेलमध्ये गेलेच नाहीत तुम्ही तर जेलमध्ये ही जाऊन आलात… 

अजून उत्तर महाराष्ट्रामध्ये बघा....मोठे पक्ष प्रवेश करणार… तुमच्याकडे कोणी राहायला तयार नाही आहे 

संजय राऊत बोलतात म्हणून लोकं राहायला तयार नाही, मी आधीही उद्धवजींना सांगितलं होतं…. पक्ष बुडेल त्यांचा 

आॅन सीमा हिरे

बडगुजर हे आमच्या विरोधात लढले..आता आमच्याकडे असणारे नेते…. एकवेळी आमचे विरोधी होते.. त्यामुळे नाराजी लवकरच दूर होईल… 

आॅन मोठे प्रवेश

काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाठा यांच्याकडे आता माणसं राहणार नाहीत

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur News: विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
Vijay Hazare Trophy Schedule : विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur News: विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
Vijay Hazare Trophy Schedule : विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
Embed widget