एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 Live : भाजप कोल्हापूरमध्ये आमदारकीचे खाते उघडणार? की कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाणार याचा फैसला आजच्या निकालानंतर होणार आहे.

LIVE

Key Events
Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 LIVE : काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा विजय

Background

Maharashtra Kolhapur North By-Election Results 2022 Live : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज (16 एप्रिल) जाहीर होणार आहे. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी पाहायला मिळाली. ही निवडणूक राज्याची पुढील राजकीय दिशादर्शक ठरणार आहे.

पोटनिवडणुकीच्या निमित्ताने का असेना भाजप कोल्हापूरमध्ये आमदारकीचे खाते उघडणार? की कोल्हापुरातून पहिली महिला आमदार म्हणून विधानसभेत जाणार याचा फैसला आजच्या निकालानंतर होणार आहे. चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महाविकास आघाडीकडून जयश्री जाधव यांनी निवडणूक लढवली. तर भाजप कडून सत्यजित कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरले. राज्यात एकच पोटनिवडणूक असल्याने दोन्ही बाजूंनी प्रचाराचा सर्वोच्च बिंदू गाठला. राज्यातील जवळपास सर्व नेत्यांनी कोल्हापुरात येऊन प्रचार केला. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती निकालाची.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष या निवडणुकीत जोरदारपणे उतरले. त्यामुळे कोल्हापूरची स्वाभिमानी जनता आपल्याला निवडून देतील असं जयश्री जाधव यांनी बोलून दाखवलं.

कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचा गेल्या तीन निवडणुकीतील आढावा

- 2009 साली छत्रपती मालोजीराजे यांचा पराभव करुन शिवसेनेचे राजेश क्षीरसागर हे पहिल्यांदा आमदार बनले 

- राजेश क्षीरसागर यांनी मालोजीराजे यांचा 3687 मतांनी पराभव केला

- 2014 साली पुन्हा राजेश क्षीरसागर हे 22421 मताधिक्य घेऊन दुसऱ्यांना आमदार झाले

- त्यावेळी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवलेले सत्यजित कदम दुसऱ्या क्रमांकावर होते

- तर 2019 साली राजेश क्षीरसागर यांचा 15199 मतांनी पराभव करुन काँग्रेसचे चंद्रकांत जाधव आमदार बनले होते

महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या प्रचारामध्ये जोरदार चुरस पाहायला मिळाली. शिवसेनेची नाराज मते कुणाच्या पारड्यात पडणार असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला? त्यामुळे अजूनही राजकीय विश्लेषकांना या निवडणुकीचा अंदाज येत नाही.

निवडणुकीचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आज दुपारी साधारण बारा वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल. त्यामुळे दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

16:11 PM (IST)  •  16 Apr 2022

चंद्रकांत पाटलांसोबत मी पण हिमालयात जाऊन येईन ; जयंत पाटलांचा टोला 

Jayant Patil : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार असतील तर मीही त्यांच्यासोबत जाऊन येईन. माझी ही इच्छा आहे हिमालयात जाण्याची. चंद्रकांत पाटील आणि माझे चांगले संबंध आहेत." असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला  आहे. 

12:59 PM (IST)  •  16 Apr 2022

Kolhapur North Bypoll Results 2022 : चोविसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 18838 मतांनी आघाडीवर

Kolhapur North Bypoll Results 2022 : चोविसाव्या फेरीत जयश्री जाधव 5337 मते तर सत्यजीत कदम यांना 2830 मते मिळाली. चोविसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 18838 मतांनी आघाडीवर आहेत. 

 

 

12:48 PM (IST)  •  16 Apr 2022

Kolhapur North Bypoll Results 2022 : तेविसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 16,331 मतांनी आघाडीवर

Kolhapur North Bypoll Results 2022 : तेविसाव्या फेरीत जयश्री जाधव 3337 मते तर सत्यजीत कदम यांना 2531 मते मिळाली. या फेरीत जयश्री जाधव यांना 806 मतांची आघाडी मिळाली आहे. तेविसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 16,331 मतांनी आघाडीवर आहेत. 

 

 

 

12:39 PM (IST)  •  16 Apr 2022

Kolhapur North Bypoll Results 2022 : बाविसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 15,525 मतांनी आघाडीवर

Kolhapur North Bypoll Results 2022 : बाविसाव्या फेरीत जयश्री जाधव 3529 मते तर सत्यजीत कदम यांना 3226 मते मिळाली. या फेरीत सत्यजीत कदम यांना 210 मतांची आघाडी मिळाली आहे. बाविसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 15,525 मतांनी आघाडीवर आहेत. आता 23 हजार 705 मतांची मोजणी बाकी आहे.

 

12:36 PM (IST)  •  16 Apr 2022

Kolhapur North Bypoll Results 2022 : एकविसाव्या फेरीत जयश्री जाधव 3452 मते तर सत्यजीत कदम यांना 3662 मते

Kolhapur North Bypoll Results 2022 : एकविसाव्या फेरीत जयश्री जाधव 3452 मते तर सत्यजीत कदम यांना 3662 मते मिळाली. या फेरीत सत्यजीत कदम यांना 210 मतांची आघाडी मिळाली आहे. एकविसाव्या फेरी अखेरीस जयश्री जाधव 15222 मतांनी आघाडीवर आहेत. 26 पैकी 21 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून आता केवळ पाच फेऱ्यांची मतमोजणी शिल्लक आहे.

 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Maharashtra Assembly Election Results 2024 : उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Maharashtra Assembly Election Results 2024 : उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
Amit Thackeray vs Sada Sarvankar: अमित ठाकरे, सदा सरवणकर की महेश सावंत; माहीममध्ये कोण आघाडीवर?, सर्व अपडेट्स एका क्लिकवर
अमित ठाकरे, सदा सरवणकर की महेश सावंत; माहीममध्ये कोण आघाडीवर?, सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Maharashtra Vidhansabha Election Result 2024: पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
Solapur vidhansabha results 2024 : सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
Maharashtra Assembly Election Result 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं  86 जागा लढवल्या, कोण बाजी मारणार? उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 86 जागा लढवल्या, कोण बाजी मारणार? उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
Embed widget