Maharashtra Assembly Election Result 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का,86 उमेदवारांपैकी 10 आमदार विजयी
NCP Sharad Pawar Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं महाविकास आघाडीतून विधानसभा निवडणूक लढवली होती. महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 86 जागा लढवल्या होत्या.
NCP Sharad Pawar Candidate List मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं महाविकास आघाडीत 86 जागा लढवल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे केवळ 10 उमेदवार विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत जोरदार पराभव स्वीकारावा लागला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या प्रचाराची धुरा सांभाळली. शरद पवार यांच्याशिवाय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे, खासदार बजरंग सोनावणे, खासदार निलेश लंके यांनी प्रचार सभा गाजवल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार प्रामुख्यानं संविधानावर असलेलं संकट, शेतकरी आत्महत्या, शेतमालाला नसलेला माल, जीएसटीमुळं शेतकऱ्यांचं होणारं नुकसान, राज्यातून बाहेर गेलेले प्रकल्प, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष फुटी, नोकरभरती मुद्यांवर आधारित राहिला. शरद पवार यांनी त्यांच्या प्रत्येक प्रचारसभेत ते केंद्र सरकारमध्ये कृषीमंत्री असताना केलेली कर्जमाफीचं उदाहरण देत राज्यात मविआचं सरकार आल्यास कर्जमाफीचा शब्द शेतकऱ्यांना दिला. याशिवाय महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटनांची आकडेवारी, राज्यातून गायब झालेल्या मुली आणि महिलांची संख्या प्रत्येक सभेत शरद पवार यांनी मतदारांपुढं मांडली.
राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीत 10 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 8 जागा जिंकत त्यांनी 80 टक्क्यांचा स्ट्राईक रेट दाखवला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत तशी कामगिरी त्यांना करता आलेली नाही.
2024 च्या विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विजयी उमेदवारांची यादी :
जयंत पाटील - इस्लामपूर
जितेंद्र आव्हाड- कळबा मुंब्रा
बापूसाहेब पठारे- वडगाव शेरी
नारायण पाटील- करमाळा
रोहित आर आर पाटील- तासगाव कवठेमहाकाळ
संदीप क्षीरसागर -बीड
माळशिरस- उत्तमराव जानकर
मोहोळ - राजू खरे
अभिजीत पाटील-माढा
रोहित पवार- कर्जत जामखेड
इतर बातम्या: