(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Corona : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज टास्क फोर्सची बैठक, नवीन निर्बंध लागू होण्याची शक्यता
Maharashtra Corona Update : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करणार आहेत. राज्यात काही नवीन निर्बंध लागतील का? याकडे लक्ष लागले आहे.
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची (Maharashtra Corona Update) संख्या झापट्यानं वाढत आहे. त्यामुळे निर्बंध लागू होण्याची चिन्हं दिसत आहे. मुख्यमंत्र्यांच्या (Cm Uddhav Thackeray) उपस्थितीत आज टास्क फोर्सची बैठक होत आहे. त्यात कोरोना निर्बंधाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे सरकार सतर्क झालं. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या टास्क फोर्सच्य़ा बैठकीकडे लक्ष लागून आहे. या बैठकीत वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर निर्बंध वाढवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आज मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली आहे.
काल राज्यात 3900 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. ओमायक्रॉनचे देशातले सर्वात जास्त रूग्ण दिल्लीनंतर महाराष्ट्रात आहेत. ही तिसऱ्या लाटेची सुरूवात असू शकते असं तज्ञांचं मत आहे. दिल्लीत ओमायक्रॉनचे 263 रुग्ण, तर महाराष्ट्रात 252 रुग्ण सापडले आहेत. पार्श्वभूमीवर आज टास्क फोर्सच्या बैठकीत काही नवीन निर्णय होतील का? याकडे लक्ष लागून आहे.
मुंबईत 7 जानेवारीपर्यंत जमावबंदी
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत आजपासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. आता मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी 7 जानेवारी 2022 पर्यंत लागू राहणार आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 30 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून 7 जानेवारीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व जागी हे आदेश लागू असतील, असं आदेशात म्हटलं आहे. या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असेल. याशिवाय महामारी कायदा 1897 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि इतर कायदेशीर तरतुदींखालील कारवाई केली जाईल, असंही यात म्हटलं आहे.मुंबई पोलिसांनी आधी 31 डिसेंबरपर्यंत मुंबईमध्ये जमावबंदी लावली होती त्यानंतर त्याचा कालावधी वाढवून सात जानेवारीपर्यंत मुंबईमध्ये जमा बंदी लावण्यात आली आहे ज्यामुळे आता पाच पेक्षा अधिक लोक जमू शकणार नाहीत. तसेच मुंबईमध्ये होणारी सार्वजनिक कार्यक्रम सभा यासाठी सुद्धा शासनाकडून नियम आणि अटी शर्ती घालण्यात आले आहेत.
- पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात लसीकरण वेगाने होईल ते पहावं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश
- Mumbai Corona Update : मुंबईत धोका वाढताच, सोमवारीही 809 नवे कोरोना रुग्ण, रुग्णवाढीचा दरही वाढला
- Exclusive : मुलांच्या लसीकरणाबाबत पडलेल्या प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर; जाणून घ्या चाईल्ड टास्क फोर्सच्या सदस्यांकडून
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha