(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kirit Somaiya Viral Photo : किरीट सोमय्यांना खुर्ची देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
BJP leader Kirit Somaiya in Mantralaya : भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्या एका फोटोवरून वाद सुरू झाला आहे.
Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya) मंत्रालयातील व्हायरल झालेल्या फोटोनंतर आता मंत्रालयातील (Mantralay) कर्मचाऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. किरीट सोमय्या हे मंत्रालयातील नगरविकास विभागात एका केबिनमध्ये फाईल तपासात होते आणि त्यावेळी किरीट सोमय्या यांना बसायला खुर्ची देणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच आता कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि तसे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती आता समोर येत आहे.
किरीट सोमय्या म्हणाले, मंत्रालयात किरीट सोमय्या नेमक्या कोणाच्या फाईल बघत होते? उद्धव ठाकरे, रविंद्र वायकर की अशोक चव्हाण? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. ठाकरे सरकारने या प्रकरणी हवी ती चौकशी करावी एसआयटी नेमावी आम्ही कोणाला घाबरत नाही. घोटाळेबाजांचे घोटाळे बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही.
काँग्रेस नेते सचिन सावंत आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावरून सोमय्यांवर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले की, भाजप नेत्यांची मानसिक स्थिती हलाखीची झाली आहे. महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची त्यांची तयारी आहे. किरिट सोमय्या यांनी अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर बसून फाईल तपासत होते, त्याची चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे सावंत यांनी म्हटले. सोमय्या यांनी नियमांचे पालन केले नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून भाजप नेते किरीट सोमय्यांनी राज्य सरकारच्या मंत्र्यांविरुद्ध आणि आघाडींच्या नेत्यांविरोधात अनेक आरोप केले आहे. त्यावरून ते कायमच चर्चेत राहिले आहे.
- MLA Son accident : टर्नला अतिवेग, सुरक्षा भिंत तोडून कार नदीपात्रात, आमदारपुत्राचा अपघात नेमका कसा झाला?
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या शिवाजी पार्कवर, अडीच महिन्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमात हजर राहणार
- किरीट सोमय्या म्हणजे भाजपची आयटम गर्ल; नवाब मलिकांची बोचरी टीका