MLA Son accident : टर्नला अतिवेग, सुरक्षा भिंत तोडून कार नदीपात्रात, आमदारपुत्राचा अपघात नेमका कसा झाला?
Wardha Car Accident : वर्ध्यातील सेलसुरामध्ये कार नदीच्या पुलावरुन कोसळून मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू. मृतांमध्ये भाजप आमदार पुत्राचाही समावेश, पंतप्रधानांकडून 2 लाखांची मदत जाहीर
Wardha Car Accident : मित्राच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करून परत येताना झालेल्या अपघातात 7 मित्रांवर काळानं घाला घातला आहे. वर्ध्याच्या (Wardha) सेलसुरामध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार पुलावरुन खाली कोसळली. या भीषण अपघातात वैद्यकीय महाविद्यालयातील 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्वजण हे सावंगीतल्या दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी होते. मृतांमध्ये भाजप आमदार विजय राहांगडाले (MLA Son Accident) यांचा मुलगा आविष्कार राहांगडाले यांचाही समावेश आहे. अपघात एवढा भीषण होता की, कारमधलं कुणीच बचावलं नाही. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. मंगळवारचा सूर्य उजाडण्यापूर्वीच ही दुखद बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे.
वर्ध्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, "काल रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास सावंगी पोलीस स्टेशनला भदाडी नदीच्या पुलाजवळ अपघात झाल्याची माहिती मिळाली. त्यावेळी तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली, तेव्हा अपघातग्रस्त वाहन त्यांच्या नजरेस पडलं नाही. मात्र जेव्हा पुलाच्या खाली नदीपात्रात पाहणी करण्यात आली, त्यावेळी अपघातग्रस्त कार दिसून आली. अपघात भीषण असल्यामुळे कारमधील सर्वांचा जागीच मृत्यू झाला होता. काही मृतदेह कारजवळ होते, तर इतरांचे मृतदेह कारच्या आतमध्ये होते. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन वर्ध्यातील शासकीय रुग्णालयात पाठवले."
पाहा व्हिडीओ : नेमकं काय झालं काल रात्री? टर्निंगला गाडीचा वेग जास्त असल्याने अपघात?
अपघात कसा घडला असावा?
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर प्राथमिक दृष्ट्या पुलाच्या काही अंतरावर यवतमाळच्या दिशेनं रस्त्याला हलकं वळण आहे. त्याठिकाणी कारची गती अतिजास्त असल्यामुळं चालकाचं नियंत्रण सुटलं असावं आणि त्यानंतर कार महामार्गाच्या दोन्ही मार्गाच्या दरम्यान असलेल्या कठड्याला धडकून पुलाची सुरक्षा भिंत तोडून नदीपात्रात कोसळली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरु केला असून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप यांनी दिली आहे.
दरम्यान, मध्यरात्री वर्ध्यात झालेल्या अपघातानं अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. वर्धा येथील दत्ता मेघे वैद्यकिय महाविद्यालयातील सात विद्यार्थ्यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये तिरोडा गोरगाव येथील (MLA Son Accident) भाजप आमदार विजय राहांगडाले यांचा मुलगा आविष्कार रहांगडाले यांचाही समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी त्यांच्या परीक्षा झाल्यामुळे पार्टी करण्यासाठी देवळीवरून वर्ध्याला येत असताना हा अपघात झाला. अचानक चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी सेलसुरा येथील नदीच्या पुलावरून खाली कोसळली. अपघात एवढी भीषण होता की, सातही विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :