(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karjat Nagarpanchayat Election Result : कर्जत नगरपंचायतीवर रोहित पवारांची जादू! मिळवली एकहाती सत्ता, राष्ट्रवादी 12 जागांवर विजयी
कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या (Karjat Nagar Panchayat Election) निकालात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं 17 पैकी 12 जागा जिंकत एकहाती सत्ता काबिज केली आहे.
कर्जत जामखेड : कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या (Karjat Nagar Panchayat Election) निकालात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे. राष्ट्रवादीनं 17 पैकी 12 जागा जिंकत एकहाती सत्ता काबिज केली आहे. राष्ट्रवादीनं 12, काँग्रेसनं 3 तर भाजपला केवळ दोन जागा जिंकता आल्या.
17 जागा असलेली कर्जत नगरपंचायतीत ओबीसी आरक्षणाच्या घोळामुळे 13 जागांवर मतदान 22 डिसेंबरला पार पडलं तर उर्वरीत 4 जागांसाठी काल मतदान झालं. गेल्या वेळी 13 जागांपैकी भाजपच्या एका उमेदवाराकडून ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने एक जागा बिनविरोध झाली होती तर भाजपच्या दुसऱ्या एका उमेदवाराने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने 11 जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. कर्जत नगरपंचायत निवडणुकीकडे (Karjat Nagar Panchayat Election) संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) व भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे (BJP Ram Shinde) या दोन नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.
Nagar Panchayat Elections 2022 Result : नगरपंचायत, झेडपीचा रणसंग्राम; आज निकाल, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
जिल्हा - अहमदनगर
नगरपंचायत - कर्जत
निकाल-
भाजप-2
राष्ट्रवादी- 12
काँग्रेस- 3
कर्जत नगरपंचायत निवडणुकीसाठी (Karjat Nagar Panchayat Election) काल पार पडलेल्या मतदान (Voting) प्रक्रियेत एकूण 80.21 टक्के मतदान (Voting) झाले होते. काल सायंकाळीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी (NCP Workers) फटाके फोडत विजयी जल्लोष साजरा केला होता.
प्रचारात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी कर्जतमधील वातावरण ढवळून निघाले होते. मतदानाच्या दिवशी सकाळी रोहित पवार व माजी मंत्री प्रा. राम शिंदे या दोघांनीही मतदान केंद्राच्या बाहेर उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता.
बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाची संग्रामपूर नगरपंचायतीत एकहाती बाजी
राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षानं बुलढाण्यातील संग्रामपूर नगरपंचायतीत एकहाती बाजी मारली आहे. बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्तीच्या 12 उमेदवार निवडून आले असून काँग्रेसला 4 तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. तर भाजपला एकही जागा मिळालेली नाही. मंत्री राजेंद्र शिंगणे आणि संजय कुटे या दोघांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
VIDEO - रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया