Job Majha: बँक नोट मुद्रणालय आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान या ठिकाणी नोकरीच्या संधी; असा करा अर्ज
Job Majha: बँक नोट मुद्रणालय (Bank Note Press, Devas) आणि राष्ट्रीय आरोग्य मिशन (National Health Mission, Beed) या ठिकाणी नोकरीच्या संधी आहेत.
Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
बँक नोट मुद्रणालय, देवास आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी पात्रता काय आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची सर्व माहिती खालीलप्रमाणे,
बँक नोट मुद्रणालय, देवास
पहिली पोस्ट - ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी)
एकूण जागा – 60
शैक्षणिक पात्रता - ITI (डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी)
दुसरी पोस्ट - ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग)
एकूण जागा – 19
शैक्षणिक पात्रता - ITI (प्रिंटिंग ट्रेड)
तिसरी पोस्ट - ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT)
एकूण जागा – 2
शैक्षणिक पात्रता - ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)
वयोमर्यादा – 18 ते 25 वर्ष
नोकरीचं ठिकाण आहे – मध्य प्रदेशातलं देवास
यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च 2022
अधिकृत वेबसाईट – bnpdewas.spmcil.com (या वेबसाईटवर गेल्यावर discover spmcil मध्ये careers वर क्लिक करा. त्यात तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. View details वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड
पोस्ट - वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी युनानी, वैद्यकीय अधिकारी आरबीएसके, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट (NLEP), सिस्टर इन्चार्ज (SNCU), स्टाफ नर्स, LHV, समुपदेशक, लेखापाल, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, एक्स-रे तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, जिल्हा आशा ब्लॉक फॅसिलिटेटर, ऍनेस्थेटिस्ट, ईएनटी सर्जन, प्रसूतीतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, फिजिशियन.
एकूण जागा – 87
शैक्षणिक पात्रता – MBBS, MSW, B.Com, MD (सविस्तर माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
वयोमर्यादा – 18 ते 43 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2022
अर्ज पाठवण्याचा पत्ता – आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड
अधिकृत वेबसाईट - beed.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर बातम्या आणि अद्यतने यात राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत विविध संवर्गाची रिक्त पदाची जाहिरात यावर क्लिक करा. पीडीएफ फाईल डाऊनलोड करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
संबंधित बातम्या:
- GSL Recruitment 2022 : आजच अर्ज करा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया; मुलाखतीच्या आधारे होणार निवड
- SBI Bank Vacancy : पदवीधर तरुणांसाठी थेट मुलाखतीद्वारे बँकेत नोकरीची सुवर्ण संधी, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख
- RBI Recruitment 2022 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती, 'या' तारखेपासून करता येणार अर्ज