पहाटे सहाच्या आधी मोजकेच दिवस होते अजान, मुस्लीम धर्मगुरूंचा दावा
Loudspeaker Row: देशभरात भोंग्यावरून चांगलेच राजकारण सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमनंतर पोलिस प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस बजावल्या आहेत.
Loudspeaker Row: देशभरात भोंग्यावरून चांगलेच राजकारण सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमनंतर पोलिस प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस बजावल्या आहेत. याचा फटका मशिदींसह मंदिरानाही बसला आहे. यामध्येच पहाटेची अजान होते म्हणून काकड आरती बंद करण्याचा निर्णय शिर्डी संस्थानने केला. मात्र 365 दिवस पहाटे सहाच्या आधी अजान दिली जात नाही, तर 5 ते 6 महिनेच पहाटे सहाच्या आधी अजान होते, असा दावा मुस्लीम धर्मगुरूंनी केला आहे.
राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर मनसैनिक कमला लागले आहेत. पहाटे पाच वाजताच कार्यकर्ते हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मशिदींसमोर जमायला सुरुवात झाली, मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली आणि न्यायालयाने त्यांना हद्दपार करण्याचे आदेश दिले. हे सर्व घडलं भोंग्यावरून सुरू असणाऱ्या पहाटेच्या अजान विरोधात, पण मुळात अजान 365 दिवस पहाटे पाच किंवा सव्वा पाच वाजता दिली जाते का? तर नाही.
सकाळी किती वाजता आणि वर्षातून किती दिवस दिली जाते अजान?
कुठल्याही मशिदीत सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेनुसार अजान दिली जाते, सूर्योदयाच्या साधारणपणे अर्धा तास आधी नमाज पठण केले जाते आणि नमाजच्या वेळेची माहिती होण्यासाठी फजरची म्हणजेच सकाळची अजान दिली जाते. पाच महिने सूर्योदय सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान होते. त्यामुळे 6 च्या आधी अजान होते, मात्र इतर महिन्यात साडेसहा पावणे सात, सव्वासात आशा वेगवेगळ्या वेळी सूर्योदय होते. त्याच्या अर्धा तास आधी अजान दिल्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत नाही, कारण ही अजान सकाळी सहानंतर होत असते. पैगंबर आदम हे सूर्योदयाच्या आधी भूतलावर अवतरले म्हणून सूर्योदयाच्या आधी अर्धा तास नमाज पठण केले जाते.
आजची वेळ बदलत असते
मुस्लीम धर्मगुरू वसीम पिरजादे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''सध्या सूर्योदय सहा वाजेच्या दरम्यान होत असल्याने अजान सव्वापाच ते साडेपाच च्या दरम्यान होते, त्याला फजरची अजान म्हणतात. या अजनाची वेळ बदलत असते. दुपारी दीड वाजता जुहरची अजान दिली जाते, याची वेळ बदलत नाही. तिसरी नमाज असर ही 5 वाजून 30 मिनिटांनी, चौथी मगरिबची नमाज सूर्यास्तनंतर म्हणजे 7 वाजून 4 मिनिटांनी दिली जाते. या अजानची वेळ सूर्यास्त प्रमाणे बदलत जाते. सर्वात शेवटची पाचवी इशाची अजान रात्री 8 वाजून 45 मिनीटांनी दिली जाते.'' म्हणूनच मशिदीवरील भोंगे लावण्यासाठी सूर्योदय आणि सूर्यास्तच्या वेळेनुसार परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे, म्हणजेच सहा वाजेच्या आधी भोंगा वापरू नये, असे न्यायालयाचे आदेश असल्यानं ज्या दिवशी साडेसहानंतर सूर्योदय होईल त्याच दिवशी पहाटेची अजान भोंग्यावरून दिली जाईल.
इतर महत्वाच्या बातम्या:
धार्मिक स्थळांनी शेगावच्या मंदिराचा घ्यावा आदर्श; परवानगी असूनही कमी आवाज होते आरती
Shirdi : शिर्डीत साईंची काकड आरती, शेजारती होणार लाऊडस्पीकर विना; सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत परवानगी, भक्तांमध्ये नाराजी
विठ्ठल मंदिराला राज ठाकरे यांच्या आंदोलनाचा फटका, मंदिर प्रशासन पोलिसांकडून भोंग्याची परवानगी घेणार