Happy New Year 2023 Live updates: ऑकलंडमध्ये नवीन वर्षाचं सर्वात आधी स्वागत, जोरदार रोषणाई, आतिषबाजी अन् उत्साह
Happy New Year 2023 Live updates: सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताची लगबग सुरू आहे. नवीन वर्षातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
New Year Celebration : नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज्यातील मुख्य पर्यटनस्थळं हाऊसफुल्ल झाली आहेत... तर देवदर्शनाने नववर्षाची सुरुवात करण्याकडे अनेकांचा कल आहे.. शिर्डी, कोल्हापूर, पंढरपूरसह अनेक मंदिरांकडे भाविकांना धाव घेतलीये. दरम्यान नववर्षाच्या स्वागताला कोणतंही गालबोट लागू नये म्हणून पोलीस सज्ज झालेत.
नववर्षाच्या निमित्तानं चर्चगेट ते विरार मार्गावर 8 विशेष लोकल धावणार आहे. मध्य मार्गावर CSMT वरून रात्री दीड वाजता शेवटची लोकल कल्याणसाठी सुटणार आहे तर हार्बर मार्गावरही शेवटची लोकल दीड वाजता धावणार आहे. नववर्षाच्या स्वागताला गालबोट लागू नये त्यासाठी महाराष्ट्र पोलीस सज्ज झालेत... चांद्यापासून बांद्यापर्यंत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे... कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत त्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे.. पोलिसांकडून मद्यपींची ब्रेथ अॅनलायझरनं चाचणी करण्यात येणार आहे... नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महाराष्ट्र पोलिसांनी केलंय..
नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख आणि प्रसिद्ध मंदिरांकडे भाविकांनी धाव घेतली आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, शिर्डीचे साई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे. सरत्या वर्षाला विठुरायाच्या दर्शनाने निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येनं पर्यटक आणि भाविक पंढरपूरमध्ये (Pandharpur) दाखल झाले आहेत. यासाठी मंदिर प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी मंदिरे रात्रभर उघडी ठेवली जाणार असली तरी विठ्ठल मंदिर मात्र नेहमीच्या वेळेत बंद होणार आहे.
आज पहाटेपासूनच साई भक्तांची मोठी गर्दी शिर्डीत दिसून येत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यासह देशभरातून लाखो आज शिर्डीत दाखल झाले आहेत. सगळ्या भक्तांना साईदर्शन घेता यावं यासाठी आज रात्रभर साई मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानं यांनी घेतला आहे. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, शिर्डीचे साई मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, अक्कलकोटचे स्वामी समर्थ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भाविकांच्या स्वागतासाठी मंदिर प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे आज सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागल्या असून साई नामाच्या जयघोषाने साईनगरी दुमदुमून गेली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोठी रोशनाई केल्याचं दिसत आहे
Dhule Marathon : मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून नववर्षाचे स्वागत
धुळे तालुक्यातील बोरकुंड येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले या मॅरेथॉन स्पर्धेत 500 हून अधिक तरुण-तरुणींनी सहभाग घेतला होता, बोरकुंड येथील इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान यांच्या वतीने या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलें होते. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
Shanishinganapur : शिंगणापुरात भाविकांची गर्दी
Ahmednagar : नववर्ष स्वागततासाठी देश, विदेशी, राज्यांच्या कानाकोपऱ्यातील भाविक मोठ्या प्रमाणात शनिशिंगणापुरात दाखल झाले आहेत. शनिवारी लाखो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. शिंगणापुरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता आठ दिवसासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. दिवसभर भाविकांसाठी महाप्रसाद, बर्फीचा प्रसाद उपलब्ध करून देण्यात आले आहे.
LPG Price : वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा चटका; एलपीजी गॅस सिलेंडर दरात वाढ
LPG Price: नव्या वर्षाची सुरुवात महागाईच्या चटक्याने झाली आहे. इंधन कंपन्यांनी आज एलपीजी गॅस सिलेंडरचे दर (LPG Cylinder Price) जाहीर केले आहेत. प्रति सिलेंडरमागे 25 रुपयांची दरवाढ ( Price Hike) करण्यात आली आहे. ही दरवाढ व्यावसायिक वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडरसाठी लागू करण्यात आली आहे. तर, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी (LPG) गॅस सिलेंडरच्या (Gas Cylinder) दरात कोणताही बदल झाला आहे. वाढत्या महागाईच्या काळात दिलासा देण्यासाठी एलपीजीचे दर (LPG Price) कमी करण्याची मागणी करण्यात येत होती. मात्र, सरकारकडून, इंधन कंपन्यांनी कोणताही दिलासा दिला नाही.
New Year 2023 : वर्षाच्या पहिल्या दिवशी वैजनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात भाविकांची गर्दी
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैद्यनाथाच्या दर्शनासाठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची मोठी रिघ लागली आहे. मंदिरात पहाटेपासूनच प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. भाविक भक्तांच्या गर्दीने वैद्यनाथ मंदिर परिसर फुलला आहे. राज्य आणि परराज्यातून भाविक परळीत दाखल झाले आहेत. एक जानेवारीपासून नववर्षास प्रारंभ झाला आहे. नववर्ष असल्याने वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी सहकुटुंब भाविक दर्शनासाठी येत असताना पाहायला मिळत आहेत