एक्स्प्लोर

Video: जेव्हा मंत्री गुलाबराव पाटलांमधील 'कव्वाल' जागा होतो...! सुरेल आवाजात कव्वाली गायली अन् माहोलच बदलला

 जळगाव तालुक्यातील (Jalgaon News) नशिराबाद गावात मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil Singing Qawwali at Jalgaon) यांनी चक्क कव्वाली म्हणून सर्वांचेच लक्ष वेधल्याचे पाहायला मिळालं.

Gulabrao Patil Kavvali at Jalgaon: मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे आपल्या बेधडक भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. रोखठोक मतं आणि स्पष्टवक्तेपणामुळं ते नेहमीच चर्चेत असतात. आता मात्र त्यांची चर्चा एका वेगळ्याच कारणानं होत आहे.  जळगाव तालुक्यातील (Jalgaon News) नशिराबाद गावात मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil Singing Qawwali at Jalgaon) यांनी चक्क कव्वाली म्हणून सर्वांचेच लक्ष वेधल्याचे पाहायला मिळालं. मंत्र्यांना तोंडपाठ कव्वाली म्हणताना पाहून यावेळी अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. यावेळी उपस्थितांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना दाद दिल्याचं पाहायला मिळालं. चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा ( Chadhta Sooraj Dheere Dheere) ही कव्वाली त्यांनी ज्या पद्धतीनं सुरात आणि लयीत गायली ते पाहून उपस्थितांनी त्यांना अक्षरश: डोक्यावरच उचलून धरलं आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं कौतुकही केलं.

शिवसेना शिंदे गटाची मुलुख मैदान तोफ म्हणून मंत्री गुलाबराव पाटील यांची ओळख आहे. शेरोशायरी द्वारे आपल्या अनोख्या शैलीतील भाषणातून मंत्री गुलाबराव पाटील विरोधकांवर निशाणा साधत असतात. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शुभारंभासाठी या कार्यक्रमाला मंत्री गुलाबराव पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही कव्वाली सादर करत आपल्यातील कलावंत जागृत असल्याच दाखवत उपस्थियांचे लक्ष वेधले. कार्यक्रमाला उपस्थित नागरिकांनी मंत्र्यांना भरभरून प्रतिसाद दिला.

गुलाबराव पाटील यांनी यावेळी चढता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा ही कव्वाली अगदी सुरात म्हटली. यावेळी उपस्थितांनी त्यांना भरभरुन दाद दिली. एकीकडे जळगाव जिल्ह्यात जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण काहीसं वेगळं असताना गुलाबराव पाटलांनी मात्र नशीराबादमध्ये माहोलच बदलून टाकला.

गुलाबराव पाटलांनी सादर केलेली कव्वाली 

फायरब्रॅन्ड नेते म्हणून गुलाबराव पाटील यांची ओळख

कट्टर शिवसैनिक (Shivsanik) म्हणून ओळख जाणारे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे  आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आहेत. आक्रमक शैली हे गुलाबराव पाटील यांचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. शिंदे गटात सामील झाल्यानंतर  त्यांच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पुन्हा पडली.  जळगाव जिल्ह्यातून आलेले गुलाबराव पाटील यांचे कॅबिनेट मंत्रीपदाची (Cabinet Minister) शपथ घेतली आहे. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा राज्याच्या मंत्रीपदाची संधी दिली आहे. एक साधा पानटपरी चालक ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. गुलाबराव पाटील यांचा राजकीय संघर्ष अतिशय खडतर राहिला आहे. कट्टर शिवसैनिक होण्याआधी ते गावात पान टपरी चालवीत होते. काही काळ त्यांनी तमाशातही काम केले आहे. ते आजही तळागाळातील लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्राधान्य देतात. मंत्री असोत किंवा नसोत ते नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. त्यामुळे त्यांना फायरब्रॅन्ड नेते म्हणून ओळखले जाते.  

ही बातमी देखील वाचा

Maharashtra Cabinet Expansion : 'नशीब' पानटपरीचे मालक ते कॅबिनेट मंत्री, मुलुखमैदान तोफ गुलाबराव पाटील यांचा झंझावाती प्रवास 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget