(Source: ECI/ABP News/ABP Majha)
संतापजनक! नराधम पित्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; बाप-लेकीच्या नात्याला काळीमा
बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केले आणि नंतर तिचे लग्न लावून देत हात पिवळे केल्याचा धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार पंढरपूर तालुक्यात समोर आलाय.
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यात (Pandharpur) एक खळबळजनक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती केले आणि नंतर तिचे लग्न लावून देत हात पिवळे केल्याचा धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार पंढरपूर तालुक्यात समोर आला आहे. या प्रकरणी या नराधम वडिलांसह त्या अल्पवयीन मुलीशी लग्न करणाऱ्या तिच्या पतीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्या अल्पवयीन मुलीची प्रसूती झाली असून तिच्या पोटी कन्यारत्न जन्मले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार दीड वर्षांपूर्वी पीडित मुलीचे मातृछत्र हरपल्याने मुलगी ही आपल्या वडिलांसोबत रहात होती. धक्कादायक बाब म्हणजे आई मरण पावल्यानंतर नराधम बापाने पीडित मुलीशी शारीरीक संबंध प्रस्थापित केले. मुलगी गरोदर राहिल्यानंतर नराधमाने पीडितेचे लग्न समाजातीलच एका मुलाबरोबर लावून दिले.
त्यानंतर अल्पवयीन पीडितेसोबत पतीने तीन ते चार वेळा शारीरीक संबंध ठेवला. पीडिता ही अगोदरच गर्भवती असल्याचे समजल्यानंतर पतीने पीडित मुलीला पुन्हा त्या नराधम बापाकडे आणून सोडले. यानंतर पीडित मुलीची सोलापूर येथील हॉस्पीटलमध्ये प्रसूती झाली. तिने एका बाळाला जन्म दिला.
ही माहिती पंढरपूर ग्रामीण पोलीसांना समजल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या जबाबानंतर बालिकेवरील लैंगिक अपराध या कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील नराधम वडील आणि अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून शारिरीक संबंध ठेवणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केल्यानंतर 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा तपास पंढरपूर ग्रामीण पोलीस निरीक्षक धनंजय जाधव करीत आहेत .
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या
'आईला सांगितलंस तर विहिरीत ढकलून देईन' अशी धमकी देत नराधम पित्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Nagpur Crime : सामूहिक बलात्कार केल्याची तरुणीची खोटी तक्रार, कारण ऐकून पोलिसही चक्रावले
Jalgaon : चार वर्षाच्या बालिकेवर पंचवीस वर्षाच्या तरुणाचा अत्याचार, आरोपी ताब्यात
कासारवडवलीत तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार व हत्या; दोषीची फाशी हायकोर्टाकडून कायम