गृहखातं माझ्याकडे, फलटणचं पाणी चोरणाऱ्यांना पकडूच, देवेंद्र फडणवीसांचा रोख कोणत्या पवारांकडे?
सातारा : उपमुख्यमंत्रभी देवेंद्र फड़णवीस यांनी आज सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये मोठं वक्तव्य केलं. फलटण तालुक्याला 23 वर्षांनी हक्काचं पाणी मिळतंय, अनेक प्रकारच्या चोऱ्या पाहिल्या, पण पाण्याची चोरी पाहिली नव्हती, असं फडणवीस म्हणाले.
सातारा : उपमुख्यमंत्रभी देवेंद्र फड़णवीस (devendra fadnavis) यांनी आज सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये मोठं वक्तव्य केलं. फलटण तालुक्याला 23 वर्षांनी (phaltan water issue) हक्काचं पाणी मिळतंय, अनेक प्रकारच्या चोऱ्या पाहिल्या, पण पाण्याची चोरी पाहिली नव्हती, असं फडणवीस म्हणाले. मी राज्याचा गृहमंत्री असल्यानं चोरी केलेल्याला पकडण्याचं काम माझ्या खात्याचं आहे, त्याला आम्ही पकडूच, असंही ते पुढे म्हणाले. फलटण तालुक्याचं पाणी वळवून आपल्या मतदारसंघात नेल्याचा आरोप पश्चिम महाराष्ट्राच्या एका मोठ्या नेत्यावर नेहमी होतो. त्यालाच अनुसरून फडणवीसांनी ही बोचरी टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या पवारांवर टीका केली? शरद पवार की अजित पवार... कुणावर हल्लाबोल केला, याची चर्चा सुरु झाली आहे.
23 वर्षानंतर या तालुक्याच्या हक्काचे पाणी या तालुक्याला प्राप्त होत आहे. नेहमी लोकं उन्हात आणि नेते सावलीत असतात पण आज नेते आणि लोकं दोन्ही उन्हात आहेत. ज्याला दुष्काळी म्हटले त्याचा डाग मिटण्याचे काम करणार आहोत, आज हक्काचे पाणी मिळणार आहे. आज फलटणमध्ये रामायणाचा नवा अध्याय सुरू करत आहोत. नरेंद्र मोदींच्या राज्यात नवीन अध्याय सुरू होतो आहे. येत्या काळात नवीन भारत आणि महाराष्ट्र उभा राहणार आहे. अनेक प्रकारच्या चोऱ्या ऐकल्या होत्या पण पाण्याची चोरी पाहायला मिळाली नाही. गृहमंत्री मीच आहे जो कुणी चोरली त्याला दंड करण्याची जबाबदारी आमची आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पैशाची चणचण भासणार नाही -
आज 23 वर्षांनी पाणी तुम्हाला मिळते आहे. हे काम जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत पैशाची चणचण भासणार नाही. संगोळ्याला पाणी मिळाले त्यामुळे लोकांचे वय वाढते पण शहाजी बापूचे वय कमी व्हायला लागले ते स्मार्ट दिसायला लागले आहेत. मोदींना भेटून सांगितले की आमच्या शेतकऱ्यांसाठी योजना द्या त्यांनी बळीराजा योजना दिली. गेल्या 13 महिन्यात आपण 8 योजनांना मान्यता दिली. मी देखील दुष्काळी भागातून येतो, त्यामुळे मला याचे दुःख मला माहिती आहे, देवेंद्र फडणवीस म्हणाले.
...तर मोठा फायदा होईल -
पुराचे पाणी कुणाच्या मालकीचे नाही म्हणून त्यावरून आम्ही योजना करण्याचे आखली. हे दुष्काळी भागाकडे वळवले तर मोठा फायदा होईल. 3300 कोटींचा प्रकल्प आहे त्याला केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. पुराचे पाणी शहरात घुसणार नाही त्याचा फायदा 10 लाख कुटुंबातील लोकांना होणार आहे. 4 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली यावी हा प्रयत्न आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
रोजगाराच्या संधी प्राप्त होणार -
रस्त्याच्या जाळ्यात देशात आठवा मतदारसंघात माढाचा प्रश्न होता. रेल्वे तयार होती पण चालली नाही कुणी अडवली माहीत नाही. आपण नवीन कॉरिडॉर करतो आहोत, त्यामुळे रोजगार इथे येणार आहेत. या भागात उद्योग आणण्याचे काम करतो आहे. रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहे. जे काम करतात त्यांना आशीर्वाद द्या, आम्ही या नेत्यांच्या पाठीशी आम्ही भक्कमपणे उभे आहोत. दुष्काळ संपवण्यासाठी आंदोलन सुरू झाले आहे. शेतीच्या बांधावर पोहचवणार तोपर्यंत शांत बसणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.