एक्स्प्लोर

Eknath Shinde : मंत्रिपदांवरून चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महायुतीत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता!

Eknath Shinde : विधानसभेमध्ये सध्या महायुतीचे सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर आता विधानपरिषदेचे महायुतीचे सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदे होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde : आजपासून (7 डिसेंबर) विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झालं आहे. प्रोटेम स्पीकर नवनिर्वाचित 288 आमदारांना शपथ देत आहेत. विशेष अधिवेशन तीन दिवस चालणार असून त्यादरम्यान नवीन सभापतींची निवडही होणार आहे. हंगामी सभापती कालिदास कोळंबकर नवीन आमदारांना शपथ देत आहे. नूतन सभापतींची निवड 9 डिसेंबरला होणार आहे. यानंतर महायुती सरकारसाठी सभागृहात विश्वासदर्शक ठराव आणला जाणार आहे. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर राज्यपाल विधानसभेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील.

मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य तारीख

महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतरही कोणत्या पक्षाला कोणते मंत्रिपद मिळणार, याबाबतची स्थिती स्पष्ट नाही. मंत्रिमंडळावरून सुरू असलेल्या गदारोळात, 11-12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असताना आज महायुतीची बैठक होऊ शकते.

विधानपरिषदेचे महायुतीचे सभागृह नेता एकनाथ शिंदे होण्याची शक्यता

दरम्यान, विधानसभेमध्ये सध्या महायुतीचे सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. यानंतर आता विधानपरिषदेचे महायुतीचे सभागृह नेतेपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. माजी विधीमंडळ सचिव अनंत कळसे यांनी या पद्धतीने निवड होऊ शकते, अशी प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना दिली. त्यामुळे हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेचे सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदे कामकाज पाहण्याची शक्यता  आहे. 

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीची बैठक होऊ शकते

दुसरीकडे, महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीची मोठी बैठक होऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात कॅबिनेट खात्यांबाबत चर्चा होणार आहे. यानंतर 11 किंवा 12 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्याआधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे गृहखात्याची मागणी केल्याचा दावा शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी केला असून, विभागांच्या विभाजनाबाबत चर्चा सुरू आहे.

भरत गोगावले यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी 11 ते 16 डिसेंबर दरम्यान मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. नागपुरात 16 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. दरम्यान, एबीपी न्यूजच्या मुलाखतीदरम्यान, जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले गेले होते की पोर्टफोलिओबाबत वाद झाला आहे का? त्यावर ते म्हणाले की, पोर्टफोलिओबाबत चर्चा सुरू आहे, मात्र कोणताही वाद नाही. तिन्ही पक्षांना योग्य तो मान देण्यात आला आहे. गृहखाते आपल्याकडेच राहणार का, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला असता, याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असे ते म्हणाले.

'शिवसेना नेते म्हणाले, गृहमंत्रालयाची मागणी केली आहे'

एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रालय हवे असून भाजप त्यांना गृहमंत्रालय देण्यास तयार नाही, अशी चर्चा सुरू आहे. शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या पुन्हा पुन्हा चर्चेत आहेत. शिंदे यांचे नेतेही उघडपणे प्रतिक्रिया देत आहेत. शिवसेना नेते गुलाबराव पाटील म्हणाले की, गृहमंत्रालयाकडे मागणी केली आहे, निर्णय तिघांनी घ्यायचा आहे, बघू काय होते ते. अजित पवारांचा पक्ष युतीत आल्याने आपल्या पक्षाचे नुकसान झाले आहे, यापेक्षा जास्त जागा जिंकता आल्या असत्या, असेही ते म्हणाले. यानंतर अजित पवार गटाकडून जोरदार पलटावार अमोल मिटकरी यांनी केला. गुलाबराव जुलाबराव होऊ नका, असा टोला मिटकरी यांनी लगावला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND VS AUS : कसोटी सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा; मिचेल मार्श आऊट की नॉट आऊट; विराट कोहली थेट अंपायरशी भिडला...
कसोटी सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा; मिचेल मार्श आऊट की नॉट आऊट; विराट कोहली थेट अंपायरशी भिडला...
Ajit Pawar: विरोधकांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल अन्यथा परवा...  अजित पवारांची मविआच्या नेत्यांना इशारा
विरोधकांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल अन्यथा परवा... अजित पवारांची मविआच्या नेत्यांना इशारा
First Time Mla List In Maharashtra : रोहित पाटील सर्वात तरुण, तर 25 ते 35 वयोगटातील फक्त 10 आमदार! महाराष्ट्रात पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी
रोहित पाटील सर्वात तरुण, तर 25 ते 35 वयोगटातील फक्त 10 आमदार! महाराष्ट्रात पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी
Ind vs Ban U19 Asia Cup 2024 Final : आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav : सुधीर मुनगंटीवार विधानभवनात दाखलSudhir Mungantiwar And Bhaskar Jadhav Video:हातात हात घालून जाधव- मुनगंटीवार यांची विधानभवनात एँट्रीOpposition Left MLA Oath Ceremony : आमदारांचा शपथविधी सोहळा सुरु होताच विरोधकांकडून सभात्यागBJP Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडला मंत्री पद हवंचं, भाजप पदाधिकाऱ्यांनी लेखाजोखा मांडला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND VS AUS : कसोटी सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा; मिचेल मार्श आऊट की नॉट आऊट; विराट कोहली थेट अंपायरशी भिडला...
कसोटी सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा; मिचेल मार्श आऊट की नॉट आऊट; विराट कोहली थेट अंपायरशी भिडला...
Ajit Pawar: विरोधकांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल अन्यथा परवा...  अजित पवारांची मविआच्या नेत्यांना इशारा
विरोधकांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल अन्यथा परवा... अजित पवारांची मविआच्या नेत्यांना इशारा
First Time Mla List In Maharashtra : रोहित पाटील सर्वात तरुण, तर 25 ते 35 वयोगटातील फक्त 10 आमदार! महाराष्ट्रात पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी
रोहित पाटील सर्वात तरुण, तर 25 ते 35 वयोगटातील फक्त 10 आमदार! महाराष्ट्रात पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांची यादी
Ind vs Ban U19 Asia Cup 2024 Final : आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
आशिया कपचा 'फायनल' थरार, टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; रणसंग्राम कुठे पाहणार? LIVE सामन्याची वेळ काय?
Calculator घेऊनच बसा! पोस्टाच्या 'या' योजनेत घरबसल्या लाखभराची कमाई पक्की, पत्नीसोबत गुंतवणूक केली तर...
Calculator घेऊनच बसा! पोस्टाच्या 'या' योजनेत घरबसल्या लाखभराची कमाई पक्की, पत्नीसोबत गुंतवणूक केली तर...
Uday Samant :  गृहखात्याबाबत अमित शाहांशी एकनाथ शिंदे चर्चा करतील, मनसेबाबतही उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
गृहखातं अन् इतर खाती मागितलेत, अमित शाहांसोबत एकनाथ शिंदे चर्चा करतील : उदय सामंत
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
आनंदाची बातमी! फेंगल चक्रीवादळचा इफेक्ट संपला, राज्यात गुलाबी थंडी पुन्हा परतणार, कुठे काय स्थिती?
Ajit Pawar: जप्त केलेली अफाट संपत्ती, पुन्हा खिशात? आयकर विभागाने अजित पवारांच्या मालमत्तेवरील जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानियांचं टीकास्त्र
अजितदादा तेव्हा झटपट “मी तर शपथ घेणार” का म्हणाले? Income Tax विभागाने जप्ती उठवल्यानंतर अंजली दमानिया संतापल्या
Embed widget