एक्स्प्लोर

Covid 19 : कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉनमधील फरक ओळखता येणार; पुण्यात भारतीय बनावटीचा चाचणीसंच विकसित

पुण्यात विकसित या चाचणीसंचाला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरची मान्यता मिळाली आहे.    

पुणे : पुण्यातील जीनपॅथ डायग्नोस्टिक्सच्या वतीने कोविड 19 च्या डेल्टा व ओमिक्रॉन प्रकारांतील फरक ओळखण्यासाठी ‘कोविडेल्टा’ हा भारतीय बनावटीचा चाचणीसंच (टेस्ट किट) विकसित करण्यात आला असून या एकाच चाचणीद्वारे कोविड विषाणूचा नेमका प्रकार ओळखणे, आता शक्य झाले आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉनमधील फरक ओळखता येणार आहे. 

या संशोधनाद्वारे कोविड 19 या संसर्गजन्य रोगाचा नेमका प्रकार ओळखणे सोपे झाले आहे. अशाच अचूक व अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत चाचण्या उपलब्ध करण्याचा आमचा उद्देश असल्याचे सांगत जीनपॅथ डायग्नोस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल जकातदार म्हणाले, “या चाचणीसंचाच्या मदतीने जगभरात सध्या धुमाकूळ घालत असलेल्या कोविड 19 च्या डेल्टा व ओमिक्रॉन सोबतच या विषाणूच्या इतर प्रकारांची ओळख पटविणे शक्य झाले आहे. सदर चाचणीसंच हा संपूर्णपणे भारतीय बनावटीचा असून याद्वारे अगदी कमी वेळेमध्ये विषाणूच्या प्रकाराबद्दल माहिती मिळते. शिवाय हा चाचणीसंच कमी दरात उपलब्ध करून देण्यात आला असून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरची मान्यता देखील त्याला मिळाली आहे.”      

जीनपॅथ डायग्नोस्टिक्सचे संस्थापक आणि चीफ सायंटिफिक ऑफिसर डॉ. निखिल फडके म्हणाले, “या चाचणीसंचाच्या मदतीने पुण्यातील कोविड 19च्या ओमिक्रॉन प्रकाराचा पहिला बाधित रुग्ण आम्ही दाखवून देऊ शकलो. इतकेच नव्हे तर पुढे सदर रुग्ण हा ओमिक्रॉन प्रकारानेच बाधित असल्याची पुष्टी पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल), आयसर,बी.जे. मेडिकल कॉलेज व पूना नॉलेज क्लस्टर (पीकेसी) सारख्या भारतीय SARS-CoV-2 जीनोमिक्स (INSACOG) कन्सोर्शीयम अंतर्गत येणाऱ्या संस्थांनीदेखील केली. सध्या भारतातील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सरकारी आणि खाजगी संस्था या कोविड विषाणूच्या प्रकारांच्या निदानासाठी व त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी या चाचणीसंचाच्या वापराचे मूल्यांकन करत आहेत.”

या चाचणीसंचाचे वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे सध्या वेगाने पसरत असलेल्या डेल्टा प्रकारातील बीए 1 व बीए 2 सोबत नवीन येत असलेला बीए 3 आणि ओमिक्रॉन या विषाणूच्या प्रकारातील ठळक फरक ओळखता येतो. सर्व ओमायक्रॉन प्रकारात काही सामाईक उत्परिवर्तन दिसून येते. बीए 2 उपप्रकारात स्पाईक जीन डेल 69-70 उत्परिवर्तन पहायला मिळत नाही. म्हणूनच सर्वत्र करण्यात येणा-या एस- जीन टारगेट फेल्युअर (एसजीटीएफ) चाचणीमध्ये देखील ते समोर येत नाही. दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व कॅनडा या देशांमध्ये नुकत्याच आढळून आलेल्या रुग्णसंख्येत 70 टक्के रुग्ण हे बीए 2 या उपप्रकारातील असून त्यांना एसजीटीएफ चाचणीमध्ये या विषाणू प्रकाराची ओळख पटविण्यास यश आले नाही. मात्र जीनपॅथतर्फे विकसित व आयसीएमआर मान्यताप्राप्त ‘कोविडेल्टा’ या चाचणीसंचात डेल्टा प्रकारात आढळून येणारे मात्र ओमिक्रॉन प्रकारात आढळून न येणारे L452R हे उत्परिवर्तन लक्षात येते. यामुळे सध्या व भविष्यात विषाणू आणि त्याच्या उपप्रकारात होणारे बदल ओळखत डेल्टा व ओमिक्रॉन प्रकारातील फरक समोर आणण्यास ‘कोविडेल्टा’ मदतशीर ठरेल, असेही डॉ. फडके यांनी सांगितले.  

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget