(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! नेपाळ दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्याच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांच्या आर्थिक मदतीची घोषणा
Nepal Bus Accident : नेपाळ येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्याच्या कुटुंबियांसोबत सरकार उभे असून मदतनिधी म्हणून 5 लाख रुपयांची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
जळगाव: नेपाळ येथील काठमांडू येथे देवदर्शनासाठी जात असताना भाविकांची बस दरीत कोसळली होती. या दुर्दैवी अपघातात (Accident) जळगावच्या (Jalgaon) 26 भाविकांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह हे नुकतेच जळगाव विमानतळ येथे दाखल झाले आहे. त्यानंतर अपघातातील मृतांवर जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तलवेळ, सुश्री गावात एकाच वेळी अंत्य संस्कार करण्यात आलेत. दरम्यान, या नेपाळ (Nepal Bus Accident) येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्याच्या कुटुंबियांसोबत सरकार उभे असून मदतनिधी म्हणून 5 लाख रुपयांची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या उपस्थितीत आज रविवारी ‘लखपती दीदीं’चा (Lakhpati Didi) मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जळगाव (Jalgaon) विमानतळ परिसरात हा कार्यक्रम होत आहे. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करत कुटुंबियांना मदतनिधीची घोषणा केली आहे.
जळगाव सोन्याची भूमी, मात्र इथल्या लाडक्या बहिणी सोन्यापेक्षाही सरस
जळगावच्या प्राईम इंडस्ट्रीयल पार्कवर आज लखपती दीदी संमेलन पार पडत आहे. यावेळी बचत गटाच्या महिलांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंतच्या गर्दीचे सर्व रेकॉर्ड आपण उपस्थित राहून मोडित काढले असल्याचा दावा केलाय. जळगाव ही सोन्याची भूमी आहे, मात्र इथल्या लाडक्या बहिणी सोन्यापेक्षा सरस असल्याचेही ते म्हणाले. राज्य सरकार महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देतंय. त्यामुळे महिला आज आत्मनिर्भर झाल्या आहे. पूर्वी राजकारणात महिलांच्या आत्मनिर्भर करण्याच्या केवळ चर्चा होत होती. मात्र आता मोदींनी ते शक्य करून दाखवलं आहे.
पंतप्रधान मोदी नुकतेच युक्रेनच्या यात्रेवरून आलेत, तरीही त्याच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही. यातूनच आपल्याला प्रेरणा मिळते. पंतप्रधान मोदींचा कायम राज्याच्या विकासाला पाठबळ मिळतो. कापूस, सोयाबीन, दूध दर याबाबतही आता मोदी लक्ष घालतील. नदीजोड प्रकल्पना पुढे नेण्यासाठी मोदी कायम आम्हाला पाठींबा देतील, असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केला.
पहिल्या बसमधील भाविक सुखरुप
नेपाळमध्ये देवदर्शनासाठी जळगावच्या वरणगावमधील अनेकजण गेले होते. यापैकी एक बस दरीत कोसळली होती. तर दुसऱ्या बसमधील भाविक सुखरुप आहेत. त्यांना गोरखपूर येथून विशेष विमानाने जळगावला आणण्यात येईल. काल आणण्यात आलेल्या मृतदेहांसाठी 26 स्वतंत्र अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली होती. नातेवाकांसोबत हे मृतदेह त्यांच्या घरापर्यंत नेले जाणार आहेत.
हे ही वाचा