मराठा समाज पुढारलेला, तो मागास नाही, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी रस्ता शोधला जातोय : छगन भुजबळ
मराठा समाजाला जे देतात ते आम्हाला द्या, हे मी मंत्रिमंडळ बैठकीतही सांगत आलो असल्याचे मत अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
Chhagan Bhujbal : मराठा समाजाला जे देतात ते आम्हाला द्या, हे मी मंत्रिमंडळ बैठकीतही सांगत आलो असल्याचे मत अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. तुम्ही तुमचेच कायदे मोडून काढताय, समान न्याय याला म्हणतात का? असा सवाल भुजबळांनी केला. सरकारने कोणत्याही दबावाखाली काम करु नये. आम्ही शपथ घेतो, कोणत्याही दबावाखाली काम करणार नाही कोणाला फेवर देणार नाही असे भुजबळ म्हणाले. शिक्षणात आज ओबीसींना जशी अर्धी फी माफ तशी मराठा समाजाला आहे. सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील महामंडळकडून मदत दिली जात असल्याचे भुजबळ म्हणाले. मराठा समाज मागास समाज नाही, पुढारलेला समाज आहे. मराठा म्हणून काय किंवा कुणबी मराठा म्हणून देखील ते ओबीसीमध्ये येऊ शकत नाहीत असे भुजबळ म्हणाले.
राजकीय दबावापोटी सामाजिक मागलासेपण ठरवू शकत नाही.
राजकीय दबावापोटी सामाजिक मागलासेपण ठरवू शकत नाही. राजकिय दृष्ट्या प्रबळ आहात म्हणून मागास प्रवर्गात समावेश करु शकत नाही असे भुजबळ म्हणाले. शिंदे कमिटी आली त्यांनी काही लाख कागदपत्रे शोधली. त्यांनी कुणबी प्रमाणपत्र दिले. दोन वर्षे कमिटी हैदराबाद तेलंगणामध्ये जाऊन कुणबी नोंदी शोधल्या आहेत. आता त्यात ज्याचा सहभाग नाही त्यासाठी रस्ता शोधला जात आहे असे भुजबळ म्हणाले.
बजेटमध्ये मराठा समाजाला 602 कोटी 44 लाख रुपये मिळाले , महाज्योतीचे पैसे रखडसे
यावर्षी बजेटमध्ये मराठा समाजाला 602 कोटी 44 लाख रुपये मिळाले आहेत. तर महाज्योतीचे मागच्या वर्षीपासून पैसे रखडल्याचे भुजबळ म्हणाले. 895 कोटी रुपये मागितले, 267 कोटी फक्त दिले, 60 टक्के पैसे कट केले, असे दरवर्षी होत आल्याचे भुजबळ म्हणाले. काल आम्ही अर्थ सचिवंना याबाबतीत विचारल्याचे भुजबळ म्हणाले. माझे भांडण मुख्यमंत्र्यांसोबत किंवा इतर कोणत्याही मंत्र्यांसोबत नाही. माझा अबोला मुख्यमंत्र्यांसोबत नसल्याचे भुजबळ म्हणाले.
बॅकवर्ड क्लासचे सर्टिफिकेट खोट्या पद्धतीने मिळविलं जातं हे दुर्दैव
मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदर करतो, त्यांचा हेतू चांगला असेल अभ्यास आहे. पण ज्या पद्धतीने ड्राफ्टिंग झाले आहे, त्या बाबतीत आम्ही अभ्यासकांशी बोललो आहे, ते बोलले हे अडचणीचे झाले आहे. पहिला जीआर होता मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र द्या, असा उल्लेख होता, त्यानंतर मनोज जरांगेंनी सांगितले आणि पात्र हा शब्द काढला. यावरुन काय समजायचे? असा सवाल भुजबळांनी केला. 3 आयोगाने फेटाळले आहे. 55 साला पासून सांगितले आहे. मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले काही केंद्रात गेले पण त्यांनी केले नाही. बॅकवर्ड क्लास चे सर्टिफिकेट खोट्या पद्धतीने मिळविले जातात हे दुर्दैव आहे असे भुजबळ म्हणाले. a























