एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

महाविकास आघाडी सरकारमुळे मराठी अधिकाऱ्यांचे नुकसान, चंद्रकांत पाटील यांची टीका

Chandrakant Patil : महाविकास आघाडी सरकारमुळे मराठी अधिकाऱ्यांचे नुकसान होत असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

Chandrakant Patil : महाविकास आघाडी सरकारमुळे मराठी अधिकाऱ्यांचे नुकसान होत असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.  राज्य सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांना आयएएस दर्जा देण्यासाठीच्या प्रक्रियेतील बैठकीस राज्यातील तीन वरिष्ठ अधिकारी वेळेत पोहोचले नाहीत. त्यामुळे मराठी अधिकाऱ्याची आयएएस होण्याची संधी हुकल्याची घटना धक्कादायक आहे. आघाडी सरकारच्या बेफिकीरमुळे मराठी अधिकाऱ्यांचे नुकसान होत आहे. मराठीच्या मुद्द्यावर आवाज उठविणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेचे याबद्दल काय म्हणणे आहे, असा सवाल यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.  

राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांना नामनिर्देशनाने आयएएस दर्जा मिळविण्याची संधी असते. कामाचे चांगले वार्षिक अहवाल असलेल्या अधिकाऱ्यांना परीक्षा आणि मुलाखतीचे टप्पे ओलांडून आयएएस होता येते. त्यासाठी राज्याकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवावे लागतात आणि उमेदवारांच्या मुलाखतीच्या टप्प्यात केंद्रातील अधिकाऱ्यांसोबत राज्यातील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांना सहभागी व्हावे लागते. डिसेंबर २०२१ मध्ये अशा एका संधीच्या वेळी राज्यातील मुख्य सचिव आणि दोन वरिष्ठ सचिव मुलाखतीच्या टप्प्यासाठी वेळेत गेले नाहीत व त्यामुळे संबंधित मराठी अधिकाऱ्याची आयएएस होण्याची संधी हुकली. आता पुन्हा ही प्रक्रिया पार पडेल तोपर्यंत थांबावे लागेल. महाविकास आघाडी सरकारचा एकूण कारभार बेफिकीरीचा आहे आणि या सरकारचे अधिकाऱ्यांवर नियंत्रण नाही यामुळे ही समस्या निर्माण झाली, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना आयएएस अधिकारी होण्याची संधी मिळण्यासाठी मुळात राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे वेळेत प्रस्ताव पाठविणे आवश्यक असते. अशा पात्र अधिकाऱ्यांचे २०२० चे प्रस्ताव २०२१ संपले तरीही पाठविले नसल्याची आपली माहिती आहे. अशा दिरंगाईमुळे मराठी अधिकाऱ्यांना संधी मिळण्यास विलंब होतो. याची जबाबदारी असलेल्या सचिवांवर महाविकास आघाडी सरकारचे नियंत्रण नाही आणि आघाडी सरकारच्या बेफिकीरीचाही वरिष्ठ अधिकारी फायदा उठवत आहेत. 

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget