News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट खेळ
X

भाजप आमदार सीमा हिरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल

FOLLOW US: 
Share:
नाशिक : नाशिक भाजपमधील बंडखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. निवडणुकीवेळी उमेदवारीसाठी पैसे वाटपाची क्लिप व्हायरल झाल्याने भाजपची बदनामी झाली होती. आता निवडणुकीनंतरही आमदार सीमा हिरे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे भाजपमधील अतंर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. भाजप आमदार सीम हिरे यांनी नाशिक महापालिकेसाठी पक्षविरोधी कारवाई केल्याचा आरोप केला जात आहे. फक्त 1 मत आम्हाला द्या, बाकीच्या 3 उमेदवारांना मत देऊ नका, अशा आशयाची सीमा हिरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे भाजपचे पराभूत उमेदवार अमोल पाटील यांनी पक्षश्रेष्ठी, मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे सीमा हिरे यांची तक्रारही केली आहे. सीमा हिरे यांचे दीर नाशिक महापालिकेच्या निवडणूक रिंगणात उभे होते. मात्र त्यांना वगळून प्रभागातील इतर कोणत्याही भाजपच्या उमेदवाराला मत देऊ नका, असं आवाहन या ऑडिओ क्लिपमधून केलं आहे. तसंच सीमा हिरे यांनी पक्षावर उघड नाराजीही व्यक्त केली आहे. मात्र अद्याप या ऑडिओ क्लिपची सत्यता पडताळलेली नाही. दरम्यान, घरभेद्यांमुळेच भाजपचा मोठा विजय हुकल्याचं पालक मंत्री गिरीश महाजन यांनी निकालानंतर नवीन नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्यात म्हटलं होतं.
Published at : 02 Mar 2017 02:05 PM (IST) Tags: भाजप आमदार BJP MLA नाशिक nashik

आणखी महत्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं

मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल

मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल

लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा

लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा

कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव

कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव

Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य

Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य

टॉप न्यूज़

''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन

''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विधानभवनवर आक्रोश मोर्चा, काय आहेत मागण्या? 

राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा विधानभवनवर आक्रोश मोर्चा, काय आहेत मागण्या? 

Sonakshi Sinha : डायमंड रिंग अन् अडीच लाखांचा कुर्ता सेट; नववधू सोनाक्षी सिन्हाकडून रोमँटिक फोटो शेअर

Sonakshi Sinha : डायमंड रिंग अन् अडीच लाखांचा कुर्ता सेट; नववधू सोनाक्षी सिन्हाकडून रोमँटिक फोटो शेअर