एक्स्प्लोर

आव्हाड-पडळकर समर्थकांमधील फ्री स्टाईल हाणामारी, अहवाल सभागृहात मांडणार, दोघांवरही कारवाई होणार?

Gopichand Padalkar Vs Jitendra Awhad : गोपीचंद पडळकरांनी त्यांच्या कार्यकर्त्याच्या कानात काहीतरी सांगितलं आणि नंतर हाणामारीची घटना घडली असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.

मुंबई : पावसाळी अधिवेशनावेळी झालेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या फ्री स्टाईल हाणामारीचा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला जाणार आहे. विधानभवनाच्या विशेष अधिकार हक्कभंग समितीकडून बुधवारी हा अहवाल विधानसभा अध्यक्षाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर गुरूवारी हा अहवाल सभागृहात ठेवला जाणार आहे.

विशेष अधिकार हक्कभंग समितीकडून या प्रकरणी आतापर्यंत सात ते आठ बैठका झाल्या असून समितीतील 18 सदस्यांनी घडलेल्या घटनेप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. यातील संबधित व्यक्तींवर कठोर कारवाई व्हायला हवी यावर समितीतील सर्वांचे एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा गोपनीय अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला जाणार आहे.

Gopichand Padalkar Vs Jitendra Awhad : पडळकर-आव्हाडांचे कार्यकर्ते भिडले

गेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये विधान भवनाच्या परिसरामध्येच हाणामारी झाली होती. पडळकरांचा कार्यकर्ता सर्जेराव टकले आणि जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुख यांच्यामध्ये ही हाणामारी झाली होती.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी सातत्याने शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका सुरू केली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी विधान भवनाच्या परिसरातच 'मंगळसूत्र चोर' अशी घोषणा दिली. एकमेकांवरील टीकेचं रुपांतर नंतर वादात झालं.

या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच विधान भवनाच्या विशेष हक्कभंग समितीकडून त्याची चौकशी करण्यात आली. त्याचा अहवाल तयार झाला असून हा अहवाल गुरुवारी सभागृहामध्ये ठेवण्यात येणार आहे.

समितीच्या या अहवालानंतर राज्य शासनाकडून या प्रकरणी कठोर पावले उचलली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर किंवा स्वतः त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra Vidhan Bhavan News : पडळकर-आव्हाडांकडून सभागृहात खेद व्यक्त

दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमधील वादावर विधानसभा अध्यक्षांनी कारवाईला केली होती. विधिमंडळ सभागृह सुरक्षा समितीच्या अहवालानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही आमदारांनी खेद व्यक्त करावा, अशा सूचना विधानसभेत दिल्या होत्या. आमदार पडळकर आणि आमदार आव्हाड यांच्याशी संबंधित ऋषिकेश टकले आणि नितीन देशमुख यांच्यावर फौजदारी करण्यात येत असल्याचे देखील नार्वेकर यांनी सांगितले होते. विधानसभा अध्यक्षांच्या सूचनेनंतर आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात खेद बाळगत करत दिलगिरी व्यक्त केली होती.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akola : अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
Badlapur : बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
Kolhapur : कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vishal Bhardwaj on Nana Patekar : वेळ पाळत नाय, नानाचा काढता पाय! Special Report
Narayan kuche Audio Clip : कुचेंचा व्हिप लक्ष्मीदर्शनाची क्लिप; पैसे वाटपाचा संवाद Special Report
Mayor Reservation Lottery Rada : महापौरपदाची 'लॉटरी' वादाची 'सोडत' Special Report
BJP vs Sahar Shaikh : सहर शेखचं ते वाक्य अन् वादाचं राजकारण Special Report
Uddhav Thackeray angry On KDMC MNS Allinace : 'मनसे' की मजबूर? संतापाचा सूर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola : अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
अकोल्यात भाजपविरोधात सर्वपक्ष एकत्रित, बहुमताचा 41 चा आकडा गाठल्याचा दावा; महापौरपद ठाकरेंची शिवसेना किंवा वंचितकडे
Badlapur : बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
बदलापूर पुन्हा हादरले, 4 वर्षांच्या चिमुकलीचं शाळेच्या व्हॅन चालकाकडून मारहाण करत लैंगिक शोषण, जमाव संतप्त 
Kolhapur : कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
कोल्हापुरात राज्य उत्पादन शुक्लची मोठी कारवाई, 1.30 कोटींची गोवा बनावटी विदेशी दारू जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2026 | गुरुवार
ICC T20 World Cup: बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
बांगलादेशचा भारतात टी-20 वर्ल्डकप खेळण्यास नकार; बदल्यात कोणाला लाॅटरी लागणार? 2009 मध्ये काय घडलं होतं?
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद
Kolhapur Municipal Corporation Mayor: कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
कोल्हापुरात भाजपकडून महापौरपदासाठी विजयसिंह देसाई, विजयसिंह खाडे सर्वाधिक रेसमध्ये; कोण बाजी मारणार? महिलांमध्ये कोणाच्या नावाची चर्चा??
Shivsena : मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
Embed widget