एक्स्प्लोर

डॉक्टरांचा हलगर्जीपणा! नांदेडमध्ये 25 वर्षीय विवाहितेचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

नांदेडमधील पाटील हॉस्पिटमधील डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे एका 25 वर्षीय विवाहितेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Nanded :  नांदेडमधील पाटील हॉस्पिटमधील डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे एका 25 वर्षीय विवाहितेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परभणी जिल्ह्यातील सोन्ना येथील रहिवासी असलेल्या सुचिता गोपीनाथ कदम यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरसह जबाबदार स्टाफवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी नांदेडच्या जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

नातेवाईकांनी केला गंभीर आरोप

सुचिता कदम यांना 8 नोव्हेंबर रोजी पाटील हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले होते. नातेवाईकांच्या आरोपानुसार, प्रसूती वेदना नसतानाही रुग्णालयातील डॉक्टरने त्यांचे सिझेरियन ऑपरेशन केले. ऑपरेशननंतर झालेल्या अति रक्तस्त्रावामुळे त्यांना बाहेरून आणलेले रक्त चढवण्यात आले. मात्र, रक्ताची कोणतीही आवश्यक चाचणी न करता ते चढवल्यामुळे सुचिता यांना त्याचे संक्रमण झाले आणि त्यांची प्रकृती गंभीर बनली. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच पाटील हॉस्पिटच्या स्टाफने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात रेफर केले. तेथेही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना हैदराबादला हलवण्यात आले. परंतु, प्रकृती साथ देत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना पुन्हा नांदेडमधील दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने अखेरीस 8 डिसेंबर रोजी सुचिता यांचे निधन झाले.

प्रसुतीनंतर बाळ सुरक्षित असले तरी मातेचा मृत्यू 

दरम्यान, हा सर्व प्रकार डॉ. मीनल पाटील यांच्या हलगर्जीपणामुळे आणि चुकीच्या उपचारांमुळे घडला, असा आरोप सुचिताच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यांनी डॉ. मीनल पाटील यांच्यासह इतरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची तीव्र मागणी केली आहे. दरम्यान, प्रसुतीनंतर बाळ सुरक्षित असले तरी मातेचा मृत्यू झाल्याने ते पोरके झाले आहे. या घटनेमुळे सर्वस्तरातून संताप व्यक्त होत आहे.

रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे

प्रसुतीसाठी सुचिता कदम यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. डॉक्टरांनी सांगितले की रक्त कमी आहे. रक्त भरावे लागेल असे सांगितले. त्यानंतर रक्त चढवण्यात आले. त्यानंतर इन्फेक्शन झाले. त्यानंतर  डॉ. मीनल पाटील यांनी सुचिता कदम यांना प्रसुतीसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेले होते. बाळ आमच्याकडे सुरक्षीत दिले. मात्र, सुचिता कदम या बेशुद्ध झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या रुग्णालयता त्यांना नेण्यात आले. तिथेही त्यांच्यावर उपचार होत नसल्याने सिकंदरबाद या ठिकाणी नेले. पण तेथील खर्च परवडत नसल्याने परत नांदेडमध्ये आणले. तिथेच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. आमच्या मागणी आहे की, या रुग्णालयावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. लवकरात लवकर त्यांना अटक करुन कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ajit Pawar Beed : बजरंग बाप्पांनी 500 ची नोट दिली अजितदादांनी नाकारली? काय घडलं?
Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?
Embed widget