एक्स्प्लोर

अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, मग नवाब मलिकांचा का नाही? नितेश राणे यांचा प्रश्न

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांचा राजीनामा घेतला. परंतु, नवाब मलिक यांच्यावर त्यापेक्षा गंभीर आरोप असूनही त्यांचा राजीनामा का घेतला नाही? असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. 

Nitesh Rane : "माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा शरद पवार यांनी लगेच घेतला. मग नवाब मलिक यांना तो न्याय का नाही? अनिल देशमुख हे हिंदु मराठा आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय केला का? अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. परंतु, नवाब मलिक यांच्यावर त्यापेक्षा गंभीर आरोप आहेत. मग मलिक यांचा शरद पवार यांनी राजीनामा का घेतला नाही? असा प्रश्न भाजप आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. 

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात नितेश राणे बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. 

नितेश राणे म्हणाले, "आपल्याला 1993 चा काळ चांगला आठवत असेल. त्यावेळी हिंदुहृदयसंम्राट बाळासाहेब ठाकरे, भाजप आणि आरएसएस नसते तर हिंदुत्वाचा विचार टिकला नसता. 1993 च्या बॉम्बस्फोटचे क्षण कुणाला आठवत असतील तर ते सांगू शकतील की, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिकांचा राजिनामा का आवश्यक आहे? दाऊद सारख्या अंडरवर्ल्डला मदत करणारे लोक लाल दिव्याच्या गाडीत आपल्या आजूबाजूला फिरले तर आपण सुरक्षित राहू का? असा प्रश्न यावेळी आमदार राणे यांनी उपस्थित केला. 

...'तर आम्ही नवाब मलिक यांच्या कानफटीत मारली असती'
"पोलीस हतबल आहेत. दाऊद बरोबर फिरणाऱ्यांना त्यांना सलाम ठोकावा लागतो. ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक कसे हातवारे करत होते. पोलिसांना थोडं बाजूला ठेवलं असतं तर आम्हीच नवाब मलिक यांच्या कानफटीत मारली असती, असं वक्तव्य राणे यांनी यावेळी केलं. 

'महानगरपालिका निवडणुकीचे युद्ध जिंकायचे आहे'
"मुंबई महानगरपालिकेत भाजपची सत्ता का गरजेची आहे? हे लोकांना समजावून सांगा. मुंबईचे अस्तित्व टिकवण्यासाठी हे काम करायचे आहे. भाजपचा झेंडा मुंबईच्या अस्तित्वासाठी महत्वाचा असून महानगरपालिका निवडणुकीचे युद्ध जिंकायचे आहे, असे वक्तव्य नितेश राणे यांनी केलं आहे. 

 'देवेंद्र फडणवीस यांना  हिंदुहृदयसंम्राट ही पदवी द्यावी'
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना  हिंदुहृदयसंम्राट ही पदवी द्यायला पाहिजे असे मत नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केले. "आपण देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानायला पाहिजेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर हिंदुहृदयसंम्राट ही पदवी कुणाला द्यायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांना द्यायाला पाहिजे, असे मत नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केले आहे. 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praniti Shinde : हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Krushi Vision : युवकांना खुणावतोय शेती स्टार्टअपचा पर्याय : ABP MajhaABP Majha Headlines :  2 PM : 11 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Krushi Vision : शेतीचं भविष्य; भविष्यातली शेती आणि तंत्रज्ञान : ABP MajhaMajha Krushi Vision : बळीराजाच्या समृद्धीसाठी कोणतं धोरण? धनंजय मुंडे Exclusive : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praniti Shinde : हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
हरियाणामध्ये जे झालं ते महाराष्ट्रात अजिबात होणार नाही; खासदार प्रणिती शिंदेंनी सांगितला मास्टरप्लॅन!
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
Rohit Pawar: अजितदादांकडून पाठीवर कौतुकाची थाप पडताच रोहित पवार म्हणाले...
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र
Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
पाकिस्तानमध्ये चार दिवसात दुसरा दहशतवादी हल्ला, 20 मृत्यूमुखी; कोळसा खाणीत रॉकेट, हँडग्रेनेडने हल्ला
Ajit Pawar : काय शिवीगाळ करायची ते करा, मला भोकं पडत नाही; अजित पवार चांगलेच संतापले
काय शिवीगाळ करायची ते करा, मला भोकं पडत नाही; अजित पवार चांगलेच संतापले
Navi Mumbai Airport: नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन, सी-295 विमानाची चाकं जमिनीला लागताच जल्लोष
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीचे उद्घाटन, सी-295 विमानाची चाकं जमिनीला लागताच जल्लोष
नाद खुळा कार... टेस्लाच्या 'रोबोटॅक्सी'ची पहिली झलक; ड्रायव्हरविना गाडी सुसाट; पाहा फोटो
नाद खुळा कार... टेस्लाच्या 'रोबोटॅक्सी'ची पहिली झलक; ड्रायव्हरविना गाडी सुसाट; पाहा फोटो
मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!
Embed widget