Chandrakant Patil : दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार, सर्व पुरावे तयार, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट
दिशा सालियन (Disha Salian murder death) प्रकरणाचा उलगडा होणार असून त्या संबंधित सर्व पुरावे तयार असल्याचं भाजप नेते चंद्रकांत पाटील (Bjp Chandrakant Patil) यांनी कोल्हापुरात सांगितले.
Chandrakant Patil : दिशा सालियन (Disha Salian death) प्रकरणाचा उलगडा होणार असून त्या संबंधित सर्व पुरावे तयार असल्याचं भाजप नेते चंद्रकांत पाटील (Bjp Chandrakant Patil) यांनी कोल्हापुरात सांगितले. दरम्यान अभिनेता सुशांत सिंह हा दिशा सालियनच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता, म्हणून त्याची हत्या करण्यात आली असल्याचे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले होते. तिने आत्महत्या केली नव्हती, तर तिची हत्या करण्यात आली असल्याचे राणे म्हणाले. यावेळी तिथे कोणत्या मंत्र्यांची गाडी होती ? असा सवालही यावेळी राणेंनी उपस्थित केला. राणेंनंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. आणखी काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार - चंद्रकांत पाटील
7 मार्चनंतर दिसा सालियन प्रकरणाचा उलगडा होणार असून त्या संबंधित सर्व पुरावे तयार असल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आज केलाय. दरम्यान दिशा सालियन प्रकरणाचा उलगडा होऊ नये यासाठी शिवराळ भाषा वापरणं सुरू असल्याचं सांगत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केलीय.
आम्हालाही जगू द्या
मुलीच्या आत्महत्येनंतर सुरू असलेले राजकारण वाईट असून आम्हालाही जगू द्या, असे भावूक आवाहन दिशा सालियन हिच्या पालकांनी केले आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर या मुद्यावर पुन्हा राजकारण सुरू झाले होते. सध्या सुरू असलेल्या आरोपांमुळे आम्ही व्यथित झाले असून आमच्या जीवाचे बरं वाईट झाल्यास नेत्यांना जबाबदार ठरवण्यात यावे असेही दिशा सालियनच्या आई-वडिलांनी म्हटले. माध्यमांशी संवाद साधताना दिशा सालियनच्या आई भावूक झाल्या होत्या.
महापौरांनी राज्य महिला आयोगाच्या सदस्यांसह दिशा सालियनच्या पालकांची भेट
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या सदस्यांसह दिशा सालियनच्या पालकांची भेट घेतली. या भेटीमध्ये दिशा सालियनच्या आई वडिलांनी महिला आयोगाकडे तक्रार अर्ज केला. त्यानंतर दिशाच्या आई-वडिलांनी माध्यमांद्वारे आवाहन केले. दिशाच्या आई म्हणाल्या की, मुलीच्या आत्महत्येबाबत पोलिसांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांना या आधीच सगळी माहिती दिली आहे. मुलीच्या आत्महत्येवर उगाच राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी केले. राजकीय नेत्यांकडून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे आमच्या मुलीचा दररोज मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले. या सगळ्या प्रकरणात आम्हाला खूप त्रास होत असून आमच्याही मनात आत्महत्येचे विचार येत आहे आणि जीवाचं काही बरंवाईट झाल्यास आरोप नेत्यांना जबाबदार ठरवण्यात यावे असेही त्यांनी म्हटले.
आम्हाला जगू द्या; पालकांची विनंती
दिशा सालियनच्या मृत्यूवरून सुरू असलेल्या आरोपांवरून आम्ही व्यथित झालो आहोत. आम्हाला जगू द्या आणि तुम्हीही जगा असे आर्जव दिशाच्या आई-वडिलांनी केले आहे. आमच्या मुलीची नाहक बदनामी होत असून हे प्रकार थांबले पाहिजे अशी विनंती दिशा सालियनच्या आई-वडिलांनी केली आहे.
राणेंचे आरोप
सुशांतच्या घरातील सावंत नावाचा मुलगा कुठे गेला? तो अद्याप बेपत्ता आहे. तसेच रॉय म्हणायचा मुलगा होता, तो कुठे गेला, तोही अद्याप गायब असल्याचे राणे यावेळी म्हणाले. तसेच दिशा सालियनच्या घरातील वॉचमन कुठे आहे? तो देखील गायब असल्याचे राणे यावेळी म्हणाले. कोण काहीतरी लपवते, हेच यावरुन स्पष्ट होत असल्याचे राणेंनी यावेळी सांगितले. लपवलेल्या गोष्टी बाहेर याव्यात असेही राणे पत्रकार परिषदे दरम्यान म्हणाले होते.
दिशा सालियान प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोप
सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला वांद्रा येथील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. ज्याचा तपास मुंबई पोलीस करत आहे. सुशांतच्या मृत्यूच्या एक आठवड्यापूर्वी म्हणजेच 8 जून रोजी सुशांत सिंहची पूर्व मॅनेजर दिशा सालीयनने मालवण येथील एका इमारतीमधून उडी मारुन आत्महत्या केली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाची दुर्दशा! ग्रंथालयातील हजारो पुस्तकं खराब, रद्दीत जमा!
- राणेंच्या बंगल्याच्या बांधकामात अनियमितता, केंद्रकडूनही सीआरझेडची नोटीस : महापौर किशोरी पेडणेकर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha