Uddhav Thackeray :मराठा बांधवांना सुविधा पुरवण्यात सरकार अपयशी,शिवसैनिकांनी सुविधा पुरवण्यासाठी कंबर कसून उभं राहावं : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी सरकार मराठा बांधवांना सुविधा पुरवण्यात अपयशी ठरल्याचं म्हटलं आहे. ठाकरे यांनी शिवसैनिकांनी मराठा बांधवांना मदत करावी, असं आवाहन केलं.

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या फोनवरुन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत संवाद साधला. यानंतर पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांनी मराठा बांधवांना पूर्ण मदत करावी, असं आवाहन केल्याची पोस्ट केली आहे.
संजय राऊत यांच्या पोस्टमध्ये काय?
शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आलेला मराठी बांधवांसाठी शिवसैनिकांनी पूर्ण मदत करावी असे आवाहन केले:
“महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आपला मराठी बांधव मुंबईत एकवटला आहे,
ही संख्या हजारोंच्या घरात आहे.
पाऊस पाण्यात चिखलात तो आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करत आहे.
सरकार त्याना सुविधा पुरवण्यात अपयशी ठरले आहे अशा वेळी तमाम शिवसैनिकाना माझे आवाहन आहे की या बांधवांना पाणी,अन्न, शौचालये अशा सुविधा पुरविण्यासाठी कंबर कसून उभे रहा
हाच आपला महाराष्ट्र धर्म आहे!’’
जय महाराष्ट्र
उद्धव ठाकरे
सरकार मराठा बांधवांना सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलं : उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांना महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठा बांधवांसाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे. सरकार मराठा बांधवांना सुविधा पुरविण्यात अपयशी ठरलं आहे त्यामुळे शिवसैनिकांना आवाहन करत या मराठा बांधवांना पाणी अन्न, शौचालय अशा सुविधा पुरवण्याच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केल्या आहेत. मराठी बांधव हा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मुंबईत एकवटला आहे आणि आरक्षणासाठी संघर्ष करत आहे, त्यामुळे या मराठा बांधवांना पूर्णपणे सहकार्य शिवसैनिकांनी मुंबईत करावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलं आहे.
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंसोबत संवाद
उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या फोनवरुन मनोज जरांगे यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी काळजी घ्या, आम्ही तुमच्या मागण्यांच्या सोबत आहोत, असा शब्द जरांगे यांना दिला. मुंबई आणि महाराष्ट्रात देखील तुमच्या सोबत आहोत. उद्धव ठाकरे यांनी सरकारने विचार करायला पाहिजे असं म्हटलं. याबाबत बोलताना मनोज जरांगे यांनी उद्धव ठाकरेंना आश्चर्य वाटलं की राज्याच्या कानाकोपऱ्यातून एवढ्या मोठ्या संख्येने आले आहेत, असं म्हटलं. पुढचा शनिवार रविवार त्यांनी येऊ देऊ नये नाही तर अख्खा मराठा समाज मुंबईत येईल, असं मनोज जरांगे म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत आलेला मराठी बांधवांसाठी शिवसैनिकांनी पूर्ण मदत करावी असे आवाहन केले:
— Sanjay Raut (@rautsanjay61) August 30, 2025
“महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून आपला मराठी बांधव मुंबईत एकवटला आहे,
ही संख्या हजारोंच्या घरात आहे
पाऊस पाण्यात चिखलात तो आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करत… https://t.co/Kjnuk5sZ0P
























