Sanjay Raut PC : फडणवीस - शिंदेंचं शाहांकडे वजन; मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल का करत नाहीत?
Sanjay Raut on Devendra Fadnavis: फडणवीस आणि शिंदे यांच केंद्रात वजन आहे, अमित शहा यांच्याकडे वजन आहे. समाजाचं नेतृत्व करणारे फडणवीस यांचे चेले आहेत. हा विषय जर केंद्रात असेल तर केंद्र तुमचंच आहे, मागण्या मान्य करु हे सांगणारे तुम्हीच होतात विरोधी पक्षात असताना, त्यामुळे आरक्षणासाठी संविधानात बदल का करत नाही? अशी विचारणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. आजचे सत्ताधारी पक्ष एकत्रित राजकीय पोळी भाजून घेत आहेत. आज समाज रस्त्यावर, चिखलात आहे पण यांना समाजाविषयी कोणतीच सहानभूती दिसत नाही. दोन समाजात आग लावण्याचं काम करत आहेत संजय राऊत म्हणाले की, फडणवीस सरकारने मराठा आंदोलनाला एक दिवसाची मुदतवाढ दिली म्हणजे मेहरबाणी केली म्हणावं लागेल. मोठ्या संख्येने आंदोलक येत आहेत, पण ते कोणाला त्रास देत नाही आहेत. फडणवीस म्हणतात आंदोलनावर कोणी पोळी भाजू नये, पण कोण भाजतंय? आपली राजकीय इच्छा शक्ती असती तर एक दिवसात आरक्षण देऊ शकला असता. आपली राजकीय इच्छाशक्ती अरबी समुद्रात बुडाली आहे, आपण राजकीय इच्छाशक्तीचे महामेरू आहात. दोन समाजात आग लावण्याचं आणि तेढ निर्माण करण्याच काम आपण करत आहात, आपण सत्तेत आहात.






















