एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil: स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील; मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil: कधीपर्यंत भाजपची री ओढणार आहात? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील अशा शब्दात राज ठाकरेंच्या टीकेला मनोज जरांगेंनी सडेतोड प्रत्युत्तर देत टीका केली आहे.

Manoj Jarange Patil on Raj Thackeray : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मुंबईत उपोषण सुरु केलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज (31 ऑगस्ट) तिसरा दिवस आहे. याचदरम्यान मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईत सुरु असणाऱ्या मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली आहे. मराठा मोर्चा आणि आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं एकनाथ शिंदेच देऊ शकतील. मनोज जरांगे परत का आले याचंही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा, असं म्हणत राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना एकप्रकारे कात्रीतचं पकडलं आहे.

दुसरीकडे याच मुद्दयावर बोट ठेवत मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं. कधीपर्यंत भाजपची री ओढणार आहात? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील अशा शब्दात राज ठाकरेंच्या टीकेला मनोज जरांगेंनी सडेतोड प्रत्युत्तर देत टीका केली आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

तुम्हाला आम्ही काही विचारलं का? मग तुम्ही आम्हाला का सल्ला देताय. तुम्ही भाजपकडे गेलात, आता पाठिंबा काढून घेतला. आम्ही 11 आमदार दिलेत तेव्हा आम्ही म्हटलं का बस्स झालं मराठवाड्यात कशाला येता? त्यामुळं तुम्हीही कशाला विचारता आम्हला. केव्हापर्यंत भाजपची री ओढणार. स्वतः ठाकरे ब्रँडचं अस्तित्व खराब करून घेताय. स्वतःचं पोरगं निवडणुकीत पडलं. तुम्ही हुशार राजकारणी, डोक्याने वागलं पाहिजे, नाही तर मुख्यमंत्री फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील. 

कधीपर्यंत मुख्यमंत्री फडणवीसची री ओढणार, तुम्हाला संपून टाकतील ते. तुम्ही त्यांच्या घरी जेवलात म्हणजे तुमचा कार्यक्रम लागलाच म्हणून समजा. तुम्हाला वाटतं तुम्ही फार हुशार आहात. मात्र गरीब मराठ्यांना सगळं  कळतं. निवडणुका लागल्या कि तुम्हाला जवळ धरतात मात्र देत काहीही नाही. खासरकी, आमदारकीच्या निवडणुका जवळ आल्या कि तुम्हाला जवळ धरतात आणि मतदान मिळालं कि दुर लोटून देतात. आता नगरपालिकेचा निवडणुका जवळ आल्यात. त्यात ठाकरे बंधूनी एकत्र कार्यक्रम घेतला तर ते भयाभीत झालेत. पुन्हा मुख्यमंत्री जवळ येत तुमच्या घरी जेवलेत म्हणजे तुम्ही झालेत खुश मात्र त्यामुळे गेला तुमचा पक्ष खड्ड्यात. अशी बोचारी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, 

2. हैदराबाद गॅझेटियर लागू करा...सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे.

3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.

4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

संबंधित बातमी:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara Nagar Palika Election: साताऱ्यात दोन्ही राजेचं मनोमिलन मात्र कार्यकर्ते काही केल्या तयार होईनात! अपक्ष उमेदवारांचा फटका दोघांनाही बसणार?
साताऱ्यात दोन्ही राजेचं मनोमिलन मात्र कार्यकर्ते काही केल्या तयार होईनात! अपक्ष उमेदवारांचा फटका दोघांनाही बसणार?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते धर्मध्वजारोहण; रामनगरी उत्साहात मग्न, मंदिराचं वैशिष्ट्य काय वाचा सर्व अपडेट्स
अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते धर्मध्वजारोहण; रामनगरी उत्साहात मग्न, मंदिराचं वैशिष्ट्य काय, वाचा सर्व अपडेट्स
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif : वॉर्डात कमी मतदान झालं तर खैर नाही, मतदारांना जेव्हा तंबी मिळते Special Report
Letter to CM Devendra Fadnavis:माओवाद्यांकडून सामूहिक आत्मसमर्पण,झोनल कमिटीचं मुख्यमंंत्र्यांना पत्र
Anant Garje On Court : पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जेला अटक, आज कोर्टात हजर करणार
Pankaja Munde PA Anant Garje Arrested : डॉ गौरी पालवे प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंच्या पीएला अटक
Periods Leave Policy कोणत्या राज्यात मिळते मासिळ पाळी रजा? Special Reports

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara Nagar Palika Election: साताऱ्यात दोन्ही राजेचं मनोमिलन मात्र कार्यकर्ते काही केल्या तयार होईनात! अपक्ष उमेदवारांचा फटका दोघांनाही बसणार?
साताऱ्यात दोन्ही राजेचं मनोमिलन मात्र कार्यकर्ते काही केल्या तयार होईनात! अपक्ष उमेदवारांचा फटका दोघांनाही बसणार?
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते धर्मध्वजारोहण; रामनगरी उत्साहात मग्न, मंदिराचं वैशिष्ट्य काय वाचा सर्व अपडेट्स
अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान मोदींच्या हस्ते धर्मध्वजारोहण; रामनगरी उत्साहात मग्न, मंदिराचं वैशिष्ट्य काय, वाचा सर्व अपडेट्स
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
नाना पटोलेंनी घेतली भाजप नेत्याची भेट; राजकीय वर्तुळात मोठ्या उलथापालथीची चर्चा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
आता आणखी एक महिला डॉक्टरनं ओव्हरडोस अन् इंजेक्शन घेत मृत्यूला कवटाळलं; शेवटच्या चिट्टीतून धक्कादायक कारणांचा उलघडा
Ravindra Chavan KDMC Election: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के तुटणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजप-शिंदे गटाची युती 100 टक्के तुटणार? रवींद्र चव्हाणांचं सूचक वक्तव्य
Smriti Mandhana: पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
पहिल्यांदा वडिलांची प्रकृती अचानक बिघडली अन् स्मृतीनं एका क्षणात लग्न थांबवलं, नंतर पलाशची सुद्धा बिघडली; अवघ्या काही तासात शाही लग्नात नेमकं झालं तरी काय?
ठाकरेंच्या शिवसेनेला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का; 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार, पक्षाचे सहकार्य मिळत नसल्याने तटस्थ राहण्याचा निर्णय
ठाकरेंच्या शिवसेनेला लातूर जिल्ह्यात मोठा धक्का; 16 पैकी 11 उमेदवारांची निवडणुकीतून माघार, पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप
तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला सांगायची गरज नाही; बीड नगरपालिका निवडणुकीत आमदार पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष टोकाला
तुमचा सोक्षमोक्ष कसा लावायचा हे पंडित कुटुंबाला सांगायची गरज नाही; बीड नगरपालिका निवडणुकीत आमदार पंडित विरुद्ध क्षीरसागर संघर्ष टोकाला
Embed widget