एक्स्प्लोर

Ashish Deshmukh: काँग्रेसमधील निलंबित नेते आशिष देशमुख यांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब, 18 जूनला करणार प्रवेश

आशिष देशमुख यांना भाजप कुठल्या मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देणार, अशी चर्चा नागपुरात सुरू आहे. मात्र माझाला मिळालेल्या माहितीनुसार, भाजपनं देशमुख यांना पद किंवा मतदारसंघाचं आश्वासन दिलेलं नाही.

नागपूर :  काँग्रेसमधील निलंबित नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशिष देशमुख 18 जून रोजी भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. नागपूर जवळच्या कोराळी येथील नैवेद्यम सभागृहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 

आशिष देशमुख यांना भाजप कुठल्या मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देणार, अशी चर्चा नागपुरात सुरू आहे. मात्र माझाला मिळालेल्या माहितीनुसार, भाजपनं देशमुख यांना पद किंवा मतदारसंघाचं आश्वासन दिलेलं नाही. त्यांना आधी संघटनात्मक जबाबदारी दिली जाईल, असं कळतंय. आशिष देशमुख यांच्यासह नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हजारो कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा केला जात आहे. काही  दिवसांपूर्वी आशिष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि  प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. त्यावेळी त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले होते. आज अखेर त्यांच्या प्रवेशाच्या बातमीने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

नागपूर जिल्ह्यातील सावनेर मतदारसंघातून 1995 पूर्वी आशिष देशमुख यांचे वडील रणजित देशमुख निवडणूक लढवत होते. तेव्हापासून काँग्रेसचा एक मोठा गट रणजीत देशमुख यांना मानणारा असून त्यामुळे आशिष देशमुख यांना सावनेरमधून भाजपची उमेदवारी दिल्यास सुनील केदार यांच्यासमोर दमदार उमेदवार देता येईल अशी भाजपची खेळी आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आशिष देशमुख सामनेरमधून भाजपचे उमेदवार राहिले होते आणि अवघ्या 3 हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. दुसऱ्या बाजूला 2014 मध्ये काटोलमधून आशिष देशमुख यांनीच अनिल देशमुख यांना पराभूत केले होते. त्यामुळे त्यांना काटोलमधून उमेदवारी दिल्यास अनिल देशमुख यांची कोंडी करता येईल असा भाजप श्रेष्ठींना वाटतंय आणि त्यामुळेच ते आशिष देशमुख यांना सावनेर किंवा काटोलमधून भाजपचा उमेदवार म्हणून समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. 

आशिष देशमुखांना भाजपकडून सावनेरमधून उमेदवारी मिळण्याची शक्यता 

आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत नागपूरजवळच्या सावनेर मतदारसंघातून आशिष देशमुख यांना भाजपचं तिकीट मिळणार का, अशी चर्चा आता सुरु झाली आहे. कारण  सावनेरमध्ये सध्या भाजपचा आमदार नाही. त्यामुळे यंदा देशमुखांना संधी मिळणार का, हे पाहावं लागेल.

हे ही वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

500 रुपयांचे बाँड घेऊन उमेदवार भेटीला, मनोज जरांगेचं सर्वच इच्छुकांना बाँड पेपरबाबत महत्त्वाचं आवाहन
500 रुपयांचे बाँड घेऊन उमेदवार भेटीला, मनोज जरांगेचं सर्वच इच्छुकांना बाँड पेपरबाबत महत्त्वाचं आवाहन
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी! अजित पवारांचा पॅटर्नच वेगळा, उमेदवार यादीपूर्वीच 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप
मोठी बातमी! अजित पवारांचा पॅटर्नच वेगळा, उमेदवार यादीपूर्वीच 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप
Maharashtra Parivartan Mahashakti : परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार?
परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्या एका क्लिकवर ABP MajhaVaishali Nagwade On Rahul Kul : राहुल कुल यांना जागा दिली तरी दौंडची जागा आमचीच, नागवडेंचा दावाSujay Vikhe Vs Jayashree Thorat : तर जागा दाखवू, थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंवर हल्ला,  संगमनेरमध्ये जुंपलीBJP Vidhansabha List : पहिली यादी जाहीर होताच भाजपला बंडखोरीचं ग्रहण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
500 रुपयांचे बाँड घेऊन उमेदवार भेटीला, मनोज जरांगेचं सर्वच इच्छुकांना बाँड पेपरबाबत महत्त्वाचं आवाहन
500 रुपयांचे बाँड घेऊन उमेदवार भेटीला, मनोज जरांगेचं सर्वच इच्छुकांना बाँड पेपरबाबत महत्त्वाचं आवाहन
Maharashtra Assembly Elections 2024 : मोठी बातमी! अजित पवारांचा पॅटर्नच वेगळा, उमेदवार यादीपूर्वीच 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप
मोठी बातमी! अजित पवारांचा पॅटर्नच वेगळा, उमेदवार यादीपूर्वीच 17 जणांना एबी फॉर्मचं वाटप
Maharashtra Parivartan Mahashakti : परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार?
परिवर्तन महाशक्तीकडून स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ अन् मिरजमध्ये उमेदवार देणार; ऊस परिषदेत उमेदवार ठरणार?
Maharashtra Assembly Elections 2024 : शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
शरद पवारांचा मोठा डाव, सिन्नरचे उदय सांगळे आज तुतारी फुंकणार, माणिकराव कोकाटेंविरोधात तिकीट फिक्स?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विदर्भामधील 'या' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् तुतारी 'मध्यस्थी'मध्ये अडकली
विदर्भामधील 'या' जागांवरून काँग्रेस अन् ठाकरेंचा वाद पेटला! 'हट्टाच्या' मशालीने हाताला 'चटके' अन् तुतारी 'मध्यस्थी'मध्ये अडकली
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार
संभाजीराजेंच्या तिसऱ्या आघाडीचे 8 उमेदवार जाहीर, बच्चू कडू अचलपूरमधून; सांगलीत 2 उमेदवार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : खासदार धनंजय महाडिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! कोल्हापूर उत्तरमधून लेकाच्या उमेदवारीसाठी भेटीगाठी?
खासदार धनंजय महाडिक थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! कोल्हापूर उत्तरमधून लेकाच्या उमेदवारीसाठी भेटीगाठी?
शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी, पाटील मातोश्रीवर; उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला
शिवसेना-काँग्रेस वाद मिटला, शरद पवारांची मध्यस्थी, पाटील मातोश्रीवर; उमेदवार यादीचा मुहूर्त ठरला
Embed widget