(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Andheri Bypoll Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार, सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल (Andheri Bypoll Result 2022) आज (6 नोव्हेंबर) जाहीर होणार आहे.
Andheri Bypoll Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल (Andheri Bypoll Result 2022) आज (6 नोव्हेंबर) जाहीर होणार आहे. ऋतुजा लटके (rutuja latke) विरुद्ध अपक्ष अशा झालेल्या लढतीकडं संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी 3 नोव्हेंबरला मतदान पार पडलं होतं. याची मतमोजणी आज होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
या निवडणुकीसाठी 31.74 टक्के मतदान झालं होतं
या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली होती. त्यांचा विजय जवळपास निश्चित मनाला जात आहे. कारण त्यांच्या विरोधात कोणत्याही मुख्य पक्षांनी आपला उमेदवार निवडणुकीत उतरवला नाही. शिवसेनेतील फुटीनंतर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याच्या लक्ष लागलं आहे. या पोटनिवडणुकीसाठी तीन नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली होती. या निवडणुकीसाठी सुमारे 31.74 टक्के मतदान झाले होते. सर्व मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीतपणे पार पडली होती.
पोटनिवडणुकीसाठी हे 7 उमेदवार रिंगणात
१. ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स)
३. मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
४. नीना खेडेकर (अपक्ष)
५. फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
६. मिलिंद कांबळे (अपक्ष)
७. राजेश त्रिपाठी (अपक्ष)
अंधेरीसह इतर सहा राज्यांमधील विधानसभेच्या सात जागांसाठी आज मतमोजणी
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालसह सहा राज्यांमधील विधानसभेच्या सात जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांसाठीची मतमोजणी देखील आजच होणार आहे. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांच्या कुटुंबाचा बालेकिल्ला असलेल्या आदमपूर मतदारसंघाचाही समावेश आहे. भजनलाल यांची नात भव्या बिश्नोई (आदमपूर विधानसभा मतदारसंघ, हरियाणा) आणि अनंत सिंग यांची पत्नी नीलम देवी (मोकामा विधानसभा मतदारसंघ, बिहार) या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज त्यांचे भवितव्य ठरणार आहे. बिश्नोई भाजप, तर नीलम राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. अनंत सिंह यांना अपात्र ठरवल्यानंतर बिहारमधील मोकामा जागेवर पोटनिवडणूक घ्यावी लागली. तसेच बिहारमधील गोपालगंज, तेलंगणातील मुनुगोडे, उत्तर प्रदेशातील गोला गोकरनाथ आणि ओडिशातील धामनगर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल आज जाहीर होणार आहे. ज्या सात जागांवर भाजप आणि प्रादेशिक पक्षात लढत आहेत. त्यापैकी तीन जागा भाजपकडे, तर दोन काँग्रेसकडे होत्या. तसेच शिवसेना आणि आरजेडी प्रत्येकी एक जागा मिळाली होती बिहार पोटनिवडणुकीत मुख्य लढत भाजप आणि आरजेडीमध्ये आहे. तर हरियाणात भाजप, काँग्रेस, आयएनएलडी आणि आम आदमी पक्ष (आप) यांच्यात आहे. तेलंगणामध्ये तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस), उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि ओडिशात बीजू जनता दल (बीजेडी) यांच्या विरोधात भाजप आहे.
महत्त्वाच्या बातम्या: