एक्स्प्लोर

Andheri East Bypoll Result 2022 Live Updates: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांची विजयी आघाडी

Andheri Bypolls Result 2022: अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचे (Andheri Bypolls Results 2022) 3 नोव्हेंबरला मतदान झालं. आज निकाल जाहीर होणार आहे.

Key Events
Andheri Bypolls Result 2022 Live Updates Andheri East by-election vote counting result today November 6 shiv sena uddhav balasaheb thackeray rutuja latke maharashtra mumbai marathi news Andheri East Bypoll Result 2022 Live Updates: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांची विजयी आघाडी
Andheri Bypolls 2022

Background

मुंबई :  मुंबई उपनगर जिल्ह्यातील '166 अंधेरी पूर्व' या मतदार संघाच्या पोटनिवडणूक प्रक्रियेचा भाग असणाऱ्या मतमोजणीसाठी मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन सुसज्ज असून  आज सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. ही मतमोजणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली महानगर पालिकेच्या शाळेमध्ये होणार आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी  निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार मतमोजणीच्या अनुषंगाने विविध स्तरीय बाबींचे सुयोग्य नियोजन करण्यात आले असून त्यानुसार व्यवस्थापन व प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येत आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी सांगितले की, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीचे मतदान हे 3 नोव्हेंबर 2022 रोजी संपन्न झाले. या मतदानानंतर रविवार दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे. या मतमोजणीसाठी 200 अधिकारी व कर्मचारी कार्यरत असणार आहेत. यामध्ये मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाची विविध खाती, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारख्या विविध संस्थांच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेसाठी मुंबई पोलीस दलाचे 300 अधिकारी व कर्मचारी आणि इतर सुरक्षा यंत्रणाही कर्तव्यावर तैनात असणार आहेत. तसेच 20 सूक्ष्मस्तरीय निरीक्षक या मतमोजणीस हजेरी लावणार आहेत. मतमोजणी प्रक्रियेत सहभाग नोंदविणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक ते प्रशिक्षण यापूर्वीच देण्यात आले आहे.

या मतमोजणी प्रक्रियेला निवडणुकीला उभे असणाऱ्या उमेदवारांचे अधिकृत व नोंदणी झालेले प्रतिनिधी देखील उपस्थित असतात.  या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या प्रत्येक उमेदवाराला आपले प्रतिनिधी म्हणून 15 व्यक्तींना नेमता येते. 'अंधेरी पूर्व' विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत.

आज सकाळी आठ वाजता टपाली मतपत्रिकांच्या गणनेने मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. त्यानंतर अर्ध्या तासाने म्हणजेच 8.30 वाजता 'ईव्हीएम' यंत्रातील मतांच्या गणनेस सुरुवात होणार आहे. टपाली मतपत्रिकांच्या गणनेसाठी एक मेज (Table) असणार असून, 'ईव्हीएम' आधारित मतमोजणीसाठी 14 मेज असणार आहेत.‌ मतमोजणीच्या एकूण 19 फेऱ्या होणार आहेत. प्रत्येक फेरीअंती मतगणनेची माहिती ध्वनिक्षेपकाद्वारे व मतमोजणी केंद्राच्या बाहेर लावण्यात आलेल्या 'एलसीडी स्क्रीन' वर देखील दाखविण्यात येणार आहे; अशीही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी यानिमित्ताने दिली आहे.

13:59 PM (IST)  •  06 Nov 2022

Andheri East Bypoll Result 2022 Live Updates: अठराव्या फेरीनंतर ऋतुजा लटकेंना 65हजार 335 मतं

Andheri East Bypoll Result 2022 Live Updates: नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ऋतुजा लटकेंनी  विजयी  आघाडी घेतली आहे. अठराव्या फेरीनंतर ऋतुजा लटकेंना 65हजार 335 मतं मिळाली आहे. 

18 व्या फेरीअंती एकूण मतमोजणी

  • ऋतुजा लटके - 65335
  • बाळा नाडार - 1485
  • मनोज नायक - 875
  • मीना खेडेकर - 1489
  • फरहान सय्यद - 1058
  • मिलिंद कांबळे - 606
  • राजेश त्रिपाठी - 1550
  • नोटा - 12691

एकूण मतमोजणी  - 85089

13:09 PM (IST)  •  06 Nov 2022

Andheri Bypolls 2022 Live Updates: ऋतुजा लटकेंना 55946 मतं

Andheri Bypolls 2022 Live Updates:  पंधराव्या फेरीअंती एकूण मतमोजणी

  • ऋतुजा लटके -55946
  • बाळा नाडार -1286
  • मनोज नाईक - 785
  • मीना खेडेकर - 1276
  • फरहान सय्यद - 932
  • मिलिंद कांबळे - 546
  • राजेश त्रिपाठी - 1330
  • नोटा - 10906

एकूण मतमोजणी  - 73007

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget