(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जय मालोकरांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या अमित ठाकरेंच्या ताफ्यातील वाहनाचा समृद्धी महामार्गावर अपघात
Amit Thackeray Accident: अमित ठाकरेंचा ताफा समृद्धी महामार्गावरून मालेगाव येथून अकोल्याकडे जात होता. अकोल्याकडे येत असताना त्यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर धडकल्या.
अकोला : राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे चिंरजीव आणि मनसे नेते (MNS) अमित ठाकरे (Amit Thackeray Accident News) यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला आहे. अकोल्यातील (Akola) पातुरजवळील भंडारज फाट्याजवळ घटना घडली आहे. सुदैवाने कोणलाही दुखापात झाली नाही. मृत मनसैनिक जय मालोकार यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी अमित ठाकरेंचा ताफा निघाला होता.
मनसेचे नेते अमित ठाकरे हे आज दिवंगत मनसे कार्यकर्ता जय मालोकर यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी अकोल्यात जात आहे. मिटकरींच्या गाडीवरच्या हल्लाप्रकरणातील जय मालोकारचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. मिटकरींच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर जय मालोकारला अस्वस्थ वाटू लागलं त्यानंतर त्यांना अकोल्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं,पण उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे जय मालोकार यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरे आज त्यांच्या निंबी मालोकार या गावी जात आहेत. त्यावेळी हा अपघात झाला आहे.
कसा झाला अपघात?
जय मालोकार यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी अमित ठाकरेंचा ताफा समृद्धी महामार्गावरून मालेगाव येथून अकोल्याकडे जात होता. अकोल्याकडे येत असताना त्यांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांवर धडकल्या. समृद्धी महामार्गावरुन खाली उतरल्यानंतर अकोल्याकडे येताना पातुरजवळील भंडारज फाटा येथे ही घटना घडली आहे. सुदैवाने कुणालाही कोणतीही दुखापत नाही. अमित ठाकरेंचा ताफा अकोला पोहोचला असून मृत मनसैनिक जय मालोकार यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावाकडे निघणार आहे.
जय मालोकारांच्या मृत्यूला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जबाबदार, नातेवाईकांचा आरोप
अकोल्यातील राड्यानंतर मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यूला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा गंभीर आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. अकोल्यात काल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा झालाय. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर हा प्रकार झाला होताय. यात अमोल मिटकरींच्या गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी मनसेच्या 13 कार्यकर्त्यांवर अकोल्यातील सिव्हील लाईन पोलीसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांचाही समावेश होताय. या राड्यानंतर जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. दरम्यान, दोषींवर कठोर कारवाईची मागणी मृतक मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या नातेवाईकांनी केलीय.
हे ही वाचा :