एक्स्प्लोर
अमित शाह प्रियकर तर उध्दव ठाकरे प्रेयसी : प्रकाश आंबेडकर
अमित शाह हा प्रियकर ऐकत नाही म्हणून नरेंद्र मोदी हा उद्धव ठाकरे यांचा नवा प्रियकर आहे असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
नाशिक : शिवसेना भाजपचं भांडण हे नवरा बायकोचं भांडण नाही तर हे प्रियकर प्रेयसीचं भांडण आहे. नवरा बायकोचं भांडण असतं तर ते तुटतं , पण हे प्रियकर-प्रेयसीचं भांडण तुटतच नाही. यामध्ये अमित शाह प्रियकर आणि उध्दव ठाकरे प्रेयसी आहेत. अमित शाह हा प्रियकर ऐकत नाही म्हणून नरेंद्र मोदी हा उद्धव ठाकरे यांचा नवा प्रियकर आहे असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
नाशिक येथे वंचित बहुजन आघाडीच्या सभेत आंबेडकरांनी सरकारवर निशाणा साधला. हवामान बदलतंय याची चर्चा आपण ऐकतोय तसेच देशातील राजकीय वातावरण बदलावे कटिबद्ध रहा. सरकारचे अनेक प्रयत्न आहेत की दंगल करावी. शहरी दहशत वाढवावी. मात्र ते जमले नाही, कोरेगाव भीमा जमले नाही, तिहेरी तलाक करून मुसलमान उठाव करतील असे यांना वाटले मात्र तेही झाले नाही, अशी टीका आंबेडकर यांनी यावेळी केली.
परवा 10 टक्के आरक्षण आले. पण हा गेम प्लान असल्याचे आंबेडकर म्हणाले. हे सरकार सगळ्यांना फसवायला निघाले होते मात्र स्वतःच फसले आहे. स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणारे हे पहिले सरकार असे आंबेडकर म्हणाले. नोटा बदलण्याचा निर्णय हा काळापैसा बाहेर जाण्यासाठी नव्हता. जूनमध्ये मोदी अमेरिकेला गेले होते. तेव्हा डेबिट आणि क्रेडिट कार्डचा करार केला की नाही? असा सवाल त्यांनी केला. आपला पंतप्रधान ब्लॅकमेल होतो आहे. जे सरकार ब्लॅकमेल होत आहे. ते सरकार हद्दपार व्हायलाच हवे, अशी टीका आंबेडकर यांनी केली.
आंबेडकर यांच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे
- बँकिंग व्यवस्था तुम्ही का बुडवायला निघाले आहात ?
- मोदी 125 ऐवजी फक्त 36 विमान खरेदी करतात आणि यात 36 हजार कोटी खाल्ले
- या देशाच्या सुरक्षा व्यवस्थेशी भाजप खेळले आहे
- काँग्रेसवाले म्हणतात तुम्ही MIM सोबत आहात म्हणून आम्ही तुमच्यासोबत युती करत नाही. म्हणजे तुम्हाला मुसलमान व्होट पाहिजे पण मुसलमान नेता नको आहे , का ?
- ही सत्ता मराठ्यांची सत्ता नाही. जर तुमची सत्ता आहे तर कांदे रस्त्यावर कांदे का फेकले जातात.
- आत्महत्या करणारे 50 टक्के शेतकरी मराठा आहेत
- नाशिक जिल्ह्यातिल आमदार, खासदार, जिल्हा बँक अध्यक्ष हे एकमेकांचे नातेवाईक. हे नातेवाईक म्हणजे मराठ्यांची मोगलाई
- मराठ्यातल्या मावळ्यांना सत्तेत स्थान नाही
- तुम्हाला माझं आवाहन आहे की गरीब मराठे वंचित आहेत म्हणून या वंचितांमध्ये तुम्ही सहभागी व्हा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement