एक्स्प्लोर
कावळेसाद दुर्घटना: दोरखंडाने खेचून एक मृतदेह काढला!
आंबोलीतील कावळेसादच्या धबधब्यात कोसळलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात चौथ्या दिवशी यश आलं आहे.
सिंधुदुर्ग: आंबोलीतील कावळेसादच्या धबधब्यात कोसळलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात चौथ्या दिवशी यश आलं आहे.
आज दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास बीडच्या प्रताप राठोडचा मृतदेह बाबल अल्मेडा यांच्या गिर्यारोहकांच्या पथकानं दोरीच्या सहाय्यानं बाहेर काढला. पण गडहिंगलजच्या इम्रान गार्दीच्या मृतदेहाचा मात्र अजूनही शोध लागू शकलेला नाही.
सोमवारी दारुच्या नशेत या दोघांचाही कावळेसादच्या दरीत तोल गेला होता. तेव्हापासून या दोघांच्या मृतदेहांना बाहेर काढण्याचे काम सुरु होते.
आंबोलीजवळच्या कावळेसाद पॉईंटवर नेमकं काय घडलं?
गेल्या 4 दिवसांपासून पाऊस, वारा आणि धुक्याशी झुंजत या गिर्यारोहकांनी प्रशासनाच्या कोणत्याही मदतीविना हा मृतदेह बाहेर काढला.
दारुच्या नशेत दोघे कोसळले
आंबोली कावळेसाद इथे दारूच्या नशेत सोमवारी संध्याकाळी प्रताप राठोड आणि इम्रान गार्दी हे दोघे युवक 600 फूट खोल दरीत कोसळून त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताचा थरारक व्हिडीओ उघड झाल्यानंतर, प्रकरणाचं सत्य समोर आलं.
मृतदेह बाहेर काढण्याचं शर्थीचं काम
गेल्या चार दिवसांपासून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. मात्र पाऊस आणि वाऱ्यामुळे या कामात अडथळे निर्माण होत आहेत.
गेले तीन दिवस समिट ॲडव्हेन्चर, हिल रायडर्स ग्रुप, मलय ॲडव्हेन्चर, ham रेडिओ या एकूण 20 जणांची टिम शोधकाम करत होत्या. मात्र या टीम रिकाम्या हाती कोल्हापूरला परतल्या.
कावळेसाद दुर्घटना: मृतदेह काढण्याचं आव्हान, आता रोप वेचाचा पर्याय
आता स्थानिक बाबल अल्मेडा आणि त्यांचे सहकारी ही शोध मोहिम करत आहेत.
मृतदेह बाहेर काढण्यास अडथळे
मृतदेह तब्बल 600 फूट खाली कोसळल्यामुळे तिथवंर जायचं कसं, हाच मोठा प्रश्न शोधकर्त्यांना आहे. कावळेसादपासून गोल फिरून शिरसिंगे या गावाला 16 किमीचा वळसा घालून तिथवर पायी पोहोचण्याचा पर्याय होता. मात्र पाऊस, पायवाट, निसरडा रस्ता, सोसाट्याचा वारा त्यामुळे इथवर पोहोचणं कठीण काम होतं.
रोप लावून खाली उतरणे
आज शोध आणि बचावकार्य करणाऱ्या पथकांनी थेट रोप वे लावून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. पण हे कामही महाकठीण आहे. त्यामुळे शोध आणि बचाव पथकांसमोर मृतदेह बाहेर काढण्याच मोठं आव्हान होतं.
संबंधित बातम्या
कावळेसाद दुर्घटना: मृतदेह काढण्याचं आव्हान, आता रोप वेचाचा पर्याय
आंबोलीजवळच्या कावळेसाद पॉईंटवर नेमकं काय घडलं?
VIDEO : सेल्फी नव्हे, दारुच्या नशेत तरुणांचा दरीत कोसळून मृत्यू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement