एक्स्प्लोर
दिव्यशक्तीसाठी नरबळीचा प्रयत्न, 11 वर्षीय मुलाचा गळा चिरला
![दिव्यशक्तीसाठी नरबळीचा प्रयत्न, 11 वर्षीय मुलाचा गळा चिरला Amaravati Three Accused Tried To Kill 11 Year Old Boy To Get The Divine Power दिव्यशक्तीसाठी नरबळीचा प्रयत्न, 11 वर्षीय मुलाचा गळा चिरला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/16075648/Amravati_Narbali-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अमरावती : अमरावतीच्या धामणगाव तालुक्यातील पिंपळखुटा येथील 11 वर्षीय मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. दिव्यशक्ती प्राप्त करण्यासाठी आरोपींनी प्रथमेश सगणे नावाच्या मुलाचा नरबळी देण्याचा प्रयत्न केला.
प्रथमेशला नागपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. यापैकी एक अल्पवयीन आहे. त्यांनी प्रथमेशचा गळा चिरल्याचं कबूल केलं आहे. आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
शंकर महाराज संचालित प्राथमिक शाळेत प्रथमेश सगणे पाचवी इयत्तेत शिकतो. तसंच याच शाळेच्या वसतिगृहात राहतो. या वसतिगृहात आचारी म्हणून काम करणारे निलेश जानराव उके (वय 22 वर्ष), सुरेंद्र रमेश मराठे (वय 30 वर्ष) हे प्रथमेशवर लक्ष ठेवून होते.
4 ते 5 वर्षांपूर्वी एका वृद्धाने आरोपींना एक पुस्तक दिलं होतं. त्या पुस्तकात लिहिलं होतं की, "जर तुम्ही एका मुलाला मारुन त्याचं रक्त बोटाला लावलं तर दिव्य-अवलौकिक शक्ती प्राप्त होईल. यानंतर दिव्यशक्ती प्राप्त करण्यासाठी आरोपी चांगल्या मुलाच्या शोधात होते."
फोनवर आई-वडिलांसोबत बोलणं करुन दोतो असं सांगत आरोपींनी प्रथमेशला गच्चीवर नेलं. त्यानंतर त्याच्यावर ब्लेडने वार केले. या घटनेत जखमी झालेल्या प्रथमेशला नागपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)